शिक्षक मतदारसंघासाठी 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक मतदारसंघासाठी 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी
शिक्षक मतदारसंघासाठी 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी

शिक्षक मतदारसंघासाठी 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी

sakal_logo
By

शिक्षक मतदारसंघासाठी
एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी
खेड, ता. २४ : राज्य निवडणूक आयोगाने कोकण शिक्षक मतदार क्षेत्रासाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये ही सूचना केली आहे.
शिक्षक मतदार मतदारसंघातील मतदार नोंदणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व भारत निवडणूक आयोगाच्या ५ सप्टेंबर २०१६ च्या पत्रानुसार शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादी नव्याने तयार करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२२ तारीख ग्राह्य मानून, त्यानुसार ज्या माध्यमिक शिक्षकांना सेवेची किमान तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. अशांची शिक्षक मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर ता. १ नोव्हेंबर २०१९ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनाही मतदार म्हणून आपले नाव नोंदविता येणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भारतीने संपर्कर दौरे राबवून आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष व कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा गेल्या जूनमध्येच शिक्षक भारतीच्या राज्यस्तरीय बैठकीत झाली. शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील आणि राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीसाठी आवश्यक तयारी सुरू केल्याचे समजते. मागील निवडणुकीतील काही उमेदवार पुन्हा आगामी होणाऱ्या या निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80446 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..