दाभोळ-बंडखोरांविरोधात कोकणातील शिवसैनिक उभे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-बंडखोरांविरोधात कोकणातील शिवसैनिक उभे
दाभोळ-बंडखोरांविरोधात कोकणातील शिवसैनिक उभे

दाभोळ-बंडखोरांविरोधात कोकणातील शिवसैनिक उभे

sakal_logo
By

बंडखोरांविरोधात कोकणातील शिवसैनिक उभे
अनंत गीते ; दादरला कोकणवासीय शिवसैनिकांचा मेळावा, बंडखोरांना धोबीपछाड देण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २४ : शिवसेनेशी दगाफटका करणाऱ्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सहा बंडखोर आमदारांना निवडणुकीत पराभवाची धूळ चारणार असा निर्धार शिवसेना नेते अनंत गीते यांनी केला. यावेळी शिवसैनिकांनी गद्दांराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सहा आमदार सहभागी झाले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेशी दगाफटका करणार्‍या बंडखोराना धोबीपछाड देण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, खारघर, पालघर, वसई, विरार येथे वास्तव्य करणार्‍या कोकणवासीय शिवसैनिकांचा मेळावा छबिलदास शाळेत आयोजित केला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना नेते अनंत गीते यांनी बंडखोरांवर टीका केली. शिवसेनेला संकट नवीन नाही. हे संकट मोठे आहे, त्यामुळे ही लढाई फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच नाही, तर प्रत्येक शिवसैनिकाची आहे. बंडखोरांच्या मागे कोणीच गेलेले नाही. फक्त त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे फिरत आहेत. कोकणातील शिवसैनिकांची मोठी ताकद बंडखोरांच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळे या संकटाचा सामना शिवसेना मोठ्या हिमतीने करणार आहे, असा विश्‍वास गीते यांनी व्यक्त केला.
मेळाव्याला जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी उपविभागप्रमुख सुनील भागडे, मंडणगडचे तालुकाप्रमुख संतोष गोवले, दापोलीचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, संतोष घोसाळकर, ज्योती भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80450 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..