गणेशोत्सव महिन्यावर; मूर्तीकारांची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव महिन्यावर; मूर्तीकारांची लगबग
गणेशोत्सव महिन्यावर; मूर्तीकारांची लगबग

गणेशोत्सव महिन्यावर; मूर्तीकारांची लगबग

sakal_logo
By

३८२९१
आंबोली ः गणेश मूर्तिशाळेत व्यस्त मूर्तिकार.

गणेशोत्सव महिन्यावर;
मूर्तीकारांची लगबग

आंबोलीत रात्री लागल्या जागू

आंबोली,ता.२४ ः गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे, तसतशी मूर्तिशाळांमध्ये लगबग वाढली आहे. २९ पासून श्रावण सुरू होत आहे. चातुर्मासात आता सणांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. पावसाळ्यात सगळ्यात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी. सध्या गणपतीची सुंदर व विविध आसनांवरती बसलेल्या मूर्ती बुकींसाठी आणि त्यासाठी पाट देण्यासाठी मूर्तिशाळेत वर्दळ वाढली आहे. गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांचीही लगबग वाढली आहे. रात्री जागू लागल्या आहेत. आंबोली येथील मूर्तिकार प्रसाद मेस्त्री यांच्या शाळेतही लगबग दिसते. पावसाळ्यात जास्त पाऊस, धुके, बाष्पयुक्त दमट हवा अशा वातावरणामुळे मातीच्या मूर्ती सुकविण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी शेकोटीने मूर्ती सुकवाव्या लागतात, असे श्री. मेस्त्री यांनी सांगितले. मुलांना गणपती हा आकर्षणाचा विषय असल्याने विद्यार्थ्यांचीही नेहमीच वर्दळ असते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80454 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top