झाडा-झुडपांनी वेढले विद्युत खांब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडा-झुडपांनी वेढले विद्युत खांब
झाडा-झुडपांनी वेढले विद्युत खांब

झाडा-झुडपांनी वेढले विद्युत खांब

sakal_logo
By

38322
मालवण ः झाडा-झुडपांनी वेढलेले शहरातील विद्युत खांब.


झाडा-झुडपांनी वेढले विद्युत खांब

मालवणातील स्थिती; पथदिव्यांच्या प्रकाशात अडथळा, अनेकदा शॉर्ट सर्किटचे प्रकार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ ः शहरातील तालुका स्कुल समोरील मुख्य रस्त्यावरील वीज पोलावर मोठ्या प्रमाणात वेलीची झाडी वाढली आहे. यामुळे या वीज पोलावरील पथदिव्यांचा पुरेसा प्रकाश रस्त्यावर पडत नसल्याचे चित्र आहे. अशाचप्रकारे शहरातील अनेक वीज पोलांवर झाडी वाढली असून यामुळे पथदिव्यांच्या प्रकाशात अडथळा येत आहे.
शहरातील तालुका स्कुल समोरील मुख्य रस्त्यावर वीज पोल असून त्यावर पथदिवा आहे. मात्र, हा वीज पोल व त्यावरील वीज वाहिन्या पूर्णपणे वेलींच्या झाडीने वेढल्या गेल्या आहेत. या पोलाच्या ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळत असल्याने याठिकाणी पथदिव्यांचा चांगला प्रकाश आवश्यक आहे. या वेलींमुळे पथदिव्यांचा प्रकाश व्यवस्थित रित्या पडत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या पोलावरील वेलीची झाडी काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मालवणात अशाच प्रकारे अनेक वीज पोल व पथदिव्यांच्या पोलांवर वेली वाढलेल्या दिसून येतात. सध्या पावसाळ्यात या वेली अधिकच वाढलेल्या आहेत.
---
महावितरणचे वेधले लक्ष
पथदिव्यांच्या प्रकाशात अडथळा येण्याबरोबरच या वेलींमुळे अनेकदा शॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही होत आहेत. वीज कर्मचाऱ्यांना या वेलींमुळे वीज पोल दुरुस्ती करतानाही अडथळे येतात. त्यामुळे अशा सर्वच वीज पोलांवरील वाढलेल्या वेली व झाडी काढण्यात याव्यात, याबाबत महावितरण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80457 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..