मालवणात 3 ऑगस़्टपासून पाच दिवसीय योग शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात 3 ऑगस़्टपासून 
पाच दिवसीय योग शिबिर
मालवणात 3 ऑगस़्टपासून पाच दिवसीय योग शिबिर

मालवणात 3 ऑगस़्टपासून पाच दिवसीय योग शिबिर

sakal_logo
By

मालवणात ऑगस्टपासून
पाच दिवसीय योग शिबिर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ ः येथील बॅ. नाथ पै सेवांगण व महिला पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ७ ऑगस्टपर्यंत पाच दिवसीय योग शिबिराचे बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे आयोजन करण्यात आले आहे.
३ ला उद्‍घाटन सोहळा, सायंकाळी पाच ते साडेपाच व साडेपाच ते सात दरम्यान योग शिबिर तसेच ४ ते ६ ऑगस्टपर्यंत सकाळी सहा ते आठ, सायंकाळी पाच ते सात अशा दोन सत्रात तसेच ७ रोजी सायंकाळी पाच ते सात शिबिर होऊन त्याच दिवशी समारोप सोहळा होणार आहे. या संदर्भात महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांनी ऑनलाईन सभा घेतली. यावेळी सभेला सहराज्य प्रभारी रमाताई जोग, जिल्हा प्रभारी नर्मदा पटेल, जिल्हा महामंत्री रश्मी अंगणे, जिल्हा कोषाध्यक्ष तृप्ती तोरस्कर, जिल्हा संघटन मंत्री दीपश्री खाडिलकर, जिल्हा संघटनमंत्री प्रणाली मराठे, जिल्हा युवती प्रभारी श्वेता गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वर्षा गावकर, संपर्क प्रमुख व तहसील प्रभारी वर्षाराणी अभ्यंकर (मालवण), संपर्क प्रमुख प्रिया कोचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जीवनाला निरोगी व सर्वांगसुंदर ठेवण्यासाठी तसेच योगाचा प्रचार व प्रसार व्हावा व या राष्ट्रधर्म कार्याविषयी जनजागृती होऊन संपूर्ण समाज आरोग्यसंपन्न व्हावा, हा या शिबिरामागचा मूळ उद्देश आहे. या शिबिराचा बालक, युवक, युवती, महिला, पुरुष तसेच सर्व वयोगटातील साधकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तहसील प्रभारी वर्षाराणी अभ्यंकर, ऋतुजा केळकर, अर्चना हर्डीकर यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80463 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top