रत्नागिरी-क्राईम पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम पट्टा
रत्नागिरी-क्राईम पट्टा

रत्नागिरी-क्राईम पट्टा

sakal_logo
By

मोकळ्या जागेत दारू पिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरीः शहरातील भगवती ब्रेकवॉटर येथील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या ४ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी २२ जुलैला सायंकाळी करण्यात आली. प्रसाद शारबिद्रे (२८, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी ), दीपक कांबळे (६५, रा. परटवणे, रत्नागिरी), अलिमियाँ मस्तान (७४) आणि नुरुद्दीन पांजरी (दोन्ही रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे चारही जण भगवती ब्रेकवॉटर येथील सार्वजनिक ठिकाणी समोर दारूची बाटली ठेऊन दारू पिण्यासाठी बसलेले असताना शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
-------
फांदी तोडताना पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी : जुवे येथील बागेतील आंबा कालमाची फांदी तोडताना खाली पडून जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २३) दुपारी ३.१५ वाजता घडली. देवजी जानू गोताड (५०, रा. गोताडवाडी काजरेकोंड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सखाराम जानू गोताड (६०, रा. गोताडवाडी काजरेकोंड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसात खबर दिली आहे. शनिवारी देवजी गोताड त्यांचा चुलत पुतण्या जितेंद्र गोताड सोबत जुवे येथील हारक्या कीर यांच्या बागेत कामाला गेले होते. तेथील आंबा कलमाची फांदी तोडत असताना तोल जाऊन देवजी गोताड खाली खडकाळ जमिनीवर पडले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन मुका मारही लागला होता.
-----
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
दाभोळ : दापोली-दाभोळ मार्गावर जालगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर एका दुचाकीस्वाराला शनिवारी (ता. २३) रात्री ७.४५ च्या सुमारास एका मोटार चालकाने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालगाव-पांगारवाडी येथील दीपक चव्हाण हे मुलीला क्लासवरून आणण्यासाठी दुचाकीने जात होते. पाऊस आल्यामुळे जालगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर थांबले होते. त्यावेळी दाभोळकडून दापोलीकडे येणाऱ्या एका मोटारीने चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत चव्हाण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
-------
कोळथरेत देशी, विदेशी दारू जप्त
दाभोळ : कोळथरे-भंडारवाडा येथे दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्या पथकाने छापा मारून ५ हजार ७६० रुपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली. दाभोळ सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता. २३) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास दाभोळ पोलीसानी कोळथरे भंडारवाडा येथे छापा मारला. त्यात पथकाने ५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १ हजार १२० रुपयांच्या ७ बाटल्या, ४८० रुपयांच्या ३ बाटल्या, ७५० रुपयांच्या ५ बाटल्या, १ हजार १९० रुपयांच्या १७ बाटल्या, तसेच २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी संशयित प्रकाश धनाजी महाडिक (वय ७३, रा. कोळथरे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80468 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top