दाभोळ-समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उदध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उदध्वस्त
दाभोळ-समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उदध्वस्त

दाभोळ-समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उदध्वस्त

sakal_logo
By

- rat24p37.jpg
38335
दापोली ः मुरूड येथे उधाणाच्या लाटांनी नारळाची झाडे उन्मळून पडली.

rat24p38.jpg
38336
दापोली ः लाटांनी उद्‌ध्वस्त झालेला किनारा


समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उद्‌ध्वस्त

धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याचा परिणाम; १७ लोकांच्या शेती, बागायतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २४ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्यामुळे मुरूड (ता. दापोली) येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्‍या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या बागायती, शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही दिवस सातत्याने किनारी भागात लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. २४) वेगाने आलेल्या लाटांनी चार ते पाच नारळाची झाडे उन्मळून पडली. किनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टचेही मोठे नुकसान झाले आहे.
मुरूड समुद्रकिनाऱ्‍यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी बागायतदारांची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत आहे. मुरूड गाव पर्यटनांसाठी प्रसिद्ध आहे. येथील किनाऱ्यावरील नारळ, पोफळीच्या बागा, उंच वाढणारे सुरू पर्यटकांचे आकर्षण ठरतात. परंतु ही बागायती आता समुद्राच्या उधाणामुळे उन्मळून जमीनदोस्त होत आहे. गेले काही दिवस सातत्याने किनारी भागात लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. २४) वेगाने आलेल्या लाटांनी चार ते पाच नारळाची झाडे उन्मळून पडली. किनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टचेही मोठे नुकसान झाले आहे. लाकडी बेंच लाटांच्या तडाख्यात वाहून गेली. समुद्रकिनाऱ्‍यांवर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज आहे. मुरूड येथील अज्ञानी वरवडेकर यांच्या मालकीच्या जमिनीत उधाणाचे पाणी शिरून संरक्षण भिंतीचे नुकसान झाले. नारळाची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर संजय बाळ यांच्या शेत जमिनीत पाणी शिरले. त्यांच्यासह इतर १५ जणांचे या उधाणामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. अज्ञानी वरवडेकर यांनी नुकसानीचा पंचनामा व्हावा यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, सरपंच यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा कधी केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80473 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..