खेड-पावसाची विश्रांती, तरीही जगबुडी इशारा पातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-पावसाची विश्रांती, तरीही जगबुडी इशारा पातळीवर
खेड-पावसाची विश्रांती, तरीही जगबुडी इशारा पातळीवर

खेड-पावसाची विश्रांती, तरीही जगबुडी इशारा पातळीवर

sakal_logo
By

पावसाची विश्रांती, तरीही जगबुडी इशारा पातळीवर
खेड तालुक्यात जोर कमी; मात्र सह्याद्रीतील पावसाचा परिणाम
खेड, ता. २४ : गेल्या चार दिवसांपासून पाऊस सरीवर आहे. दिवसभरात दोन चार मोठ्या सरी येतात. मात्र तालुक्याच्या आंबवली-वडगाव या सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा जोर कायमच आहे. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून ती इशारा पातळीवरून वाहत आहे.
खेड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जगबुडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाणीपातळी नेहमीसारखी असली तरी जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे. रात्री पावसाच्या सरी कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत तर तुरळक प्रमाणात सरी पडल्या. गेले दोन दिवस सूर्यदर्शनही झाल्याने तालुक्यातील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शेतकऱ्यांनीही लावणीची कामे संपवण्याकडे लक्ष दिले आहे.
तालुक्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी सह्याद्रीच्या आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेथून वाहून येणारे पाणी जगबुडी नदीला मिळते. ही जगबुडी खेड शहराजवळून वाहते. मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला समांतर पाणी वाहत आहे. या नदीची धोक्याची पातळी ५ मीटरवर आहे. सध्या ती ५.५ मिटरवरून वाहत आहे.
-------
चौकट
गेल्या चार दिवसातील पावसाची आकडेवारी
तारीख पाऊस (मिलिमीटर)
२१ जुलै ७.०
२२ जुलै ६.०
२३ जुलै ८.०
२४ जुलै २२.०

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80474 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..