देवगडात मत्स्यखवय्यांची झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात मत्स्यखवय्यांची झुंबड
देवगडात मत्स्यखवय्यांची झुंबड

देवगडात मत्स्यखवय्यांची झुंबड

sakal_logo
By

देवगडात मत्स्यखवय्यांची झुंबड

श्रावणाची चाहूल; स्थानिक बाजारात मटण, चिकनसह माशांचे दर तेजीत

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः श्रावण महिना तोंडावर आल्याने खवय्यांनी आजपासूनच आपला मोर्चा मांसाहाराकडे वळवल्याचे दिसत होते. स्थानिक बाजारात मटण, चिकन याबरोबरच मासे खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केली होती.
गुरूवारी (ता.२८) आषाढ अमावस्या होऊन शुक्रवारपासून (ता.२९) श्रावण महिन्याला प्रारंभ होणार आहे. श्रावणात अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात. काहीजण श्रावणापासून गणपती विसर्जन होइपर्यंत मांसाहार टाळतात. त्यामुळे तत्पुर्वी मांसाहारावर ताव मारून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र यावेळी अमावस्येला गुरूवार येत असल्याने अनेकजण बुधवारीच मांसाहाराचा बेत करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चिकन, मटण व्यावसायिकांनी नियोजन केल्याचे दिसत होते. मात्र काहींनी आजपासूनच आपला मोर्चा मांसाहाराकडे वळवल्याचे चित्र होते. आज रविवार असल्याने नोकरदार मंडळीनी चिकन, मटण तसेच मासळी खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने मासळी मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. दरम्यान, श्रावणामुळे आता भाजी उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. गावठी भाजीला मागणी वाढणार आहे.
---
कालवे, तिसऱ्यांना मागणी
श्रावणापूर्वीची मासळी खरेदीची लगबग ओळखून उपलब्ध मासळीचे दर कमालीचे वधारले होते. सुळे, शेतके मासळीचे दर चांगलेच तेजीत होते. कालवे, तिसऱ्या, मुळे यांनाही खवयांकडून मोठी मागणी होती. तसेच खडकी मासळीला मागणी होती.
--
श्रावणात मासाहात का टाळतात?
वैज्ञानिकांच्या मते, पावसाळा म्हणजे मासे आणि इतर जलीय जीवांची पैदास होण्याचा काळ. मांसाहार टाळल्यास जलचरांची पैदास जास्त होऊ शकेल. दरम्यान, हिंदू धर्मात श्रावण हा प्रेमाचा, पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे श्रावणात लोक मांसाहार टाळतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80483 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..