लोखंडी प्लेट्स चोरणारा ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोखंडी प्लेट्स चोरणारा ताब्यात
लोखंडी प्लेट्स चोरणारा ताब्यात

लोखंडी प्लेट्स चोरणारा ताब्यात

sakal_logo
By

लोखंडी प्लेट्स चोरणारा ताब्यात

संशयित नेरुरचा; सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे क्षेत्रातील ओरोस येथील सिद्धीप्रिया बिल्डिंग येथील १२५ सेंट्रीगच्या १२५ लोखंडी प्लेट्स अज्ञाताने ७ जुलैला चोरून नेल्या होत्या. या चोरट्यांचा मुसक्या आवळण्यात सिंधुदुर्गनगरी पोलिसांना यश आले. राजन आनंद सडवेलकर (रा.नेरुर,ता.कुडाळ), असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली.
चोरीला गेलेल्या सेंट्रींगच्या १२५ प्लेट्स चोरून भंगाराला दिल्याची दाट शक्यता होती. तसेच या प्लेट्स घेऊन जाण्यासाठी टेम्पोचा वापर केल्याचीही दाट शक्यता होती. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक देवरे यांनी विशेष पथक तयार केले. हे पथक सतत रात्रंदिवस जिल्ह्यातील भंगारवाले तसेच टेम्पो चालक मालकांकडे माहिती घेत होते. दरम्यानच्या काळात कुडाळ येथील भंगारवाल्याकडे हे चोरीला गेलेले प्लेट्स विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे याबाबत संबंधित भंगारवाल्याकडे चौकशी करून संशयिताचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. चौकशी दरम्यान संशयितचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक देवरे, उपनिरीक्षक वारा आदींनी तपासकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80486 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..