
बीडीओ चव्हाण पांग्रड गावाचे रत्न
38376
पांग्रड ः गावाच्यावतीने विजय चव्हाण यांचा सत्कार करताना माजी सभापती किशोर मर्गज. सोबत दादू मर्गज, विजय मर्गज, औदुंबर मर्गज, आनंद कुंभार, के. टी. चव्हाण, रामचंद्र लिंगायत, सुमन मर्गज आदी.
बीडीओ चव्हाण पांग्रडचे रत्न
किशोर मर्गज ः पदोन्नतीमुळे गावाचे नाव उज्वल
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः पांग्रड गावाने अनेक रत्ने जन्माला घातली. त्या रत्नांनी दैदीप्यमान कर्तृत्वाने स्वतःचे आणि पांग्रडचे नाव उज्वल केले. यापैकीच एक रत्न म्हणजे महाराष्ट्र विकास सेवेत प्रशासकीय झेंडा कायम फडकवत ठेवणारे गटविकास अधिकारी विजय चव्हाण होय, असे प्रतिपादन माजी सभापती किशोर मर्गज यांनी केले.
तालुक्याला सतत तीन वर्षे राज्यस्तरावर प्रथम क्रमांकवार ठेवत दरवर्षी ३१ लाख रुपयांचा (कै.) यशवंतराव चव्हाण अभियान पुरस्कार मिळवून दिला. तसेच राज्य शासनाने २०१८ मध्ये त्यांना सर्वोत्तम गुणवंत अधिकारी पुरस्काराने गौरविले आहे. त्यांची नुकतीच राज्य शासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सवर्गात निवडश्रेणीमध्ये पदोन्नती मिळाल्यानिमित्त गावाच्यावतीने पांग्रड येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती किशोर मर्गज, पांग्रड महादेव देवस्थान समितीचे अध्यक्ष दादू मर्गज, सचिव व तंटामुक्ती अध्यक्ष औदुंबर मर्गज, पांग्रड मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजय मर्गज, समाज कल्याणचे विस्तार अधिकारी आनंद कुंभार, पांग्रड सरपंच अमोल मर्गज, स्वयंभू दशावतार मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र लिंगायत, माजी सरपंच रावजी मर्गज, माजी सरपंच सुनील मर्गज, अतुकाका मर्गज, सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक संघांचे माजी जिल्हाध्यक्ष के. टी. चव्हाण, ग्रामसेवक अतुल कदम, रवींद्र सावंत, लिलबा मर्गज, सुमन मर्गज, आनंद मर्गज, नंदिनी चव्हाण, विजय कदम, अमोल पांग्रडकर, अच्युत चव्हाण, माजी उपसरपंच संदेशा चव्हाण, तानाजी चव्हाण, रामू मेस्त्री, असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पांग्रडचे मावळते ग्रामसेवक अतुल कदम यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय मर्गज यांनी केले.
------------
कोट
माझ्या प्रत्येक यशात प्रशासकीय वाटचालीत जन्मभूमी पांग्रड गावाचे फार मोठे योगदान आहे. गावाने केलेला सत्कार कायम स्मरणात राहणार असून नवी ऊर्जा व उमेद देणारा आहे. गावाची आणि गावावाल्याची जेवढी सेवा आणि विकास करता येईल तेवढे मनोभावे योगदान देणार असून हा माझा सत्कार नसून माझ्या सर्व चव्हाण कुटुंबाचा व अख्या गावाचा असून श्री स्वयंभू महादेवाचे आशीर्वाद आहेत.
- विजय चव्हाण, गटविकास अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80555 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..