वेंगुर्लेत पालिकेतर्फे ‘घनवनवृक्ष लागवड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत पालिकेतर्फे ‘घनवनवृक्ष लागवड’
वेंगुर्लेत पालिकेतर्फे ‘घनवनवृक्ष लागवड’

वेंगुर्लेत पालिकेतर्फे ‘घनवनवृक्ष लागवड’

sakal_logo
By

38380
वेंगुर्ले ः घनवन वृक्षलागवड उपक्रमावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, संगिता कुबल व अन्य.


वेंगुर्लेत पालिकेतर्फे
‘घनवनवृक्ष लागवड’
वेंगुर्ले ः नगरपरिषदेच्यावतीने वनसंवर्धन दिनानिमित्त जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी ‘घनवनवृक्ष लागवड’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शिसव, खैर, आवळा, काजू वगैरे वेगवेगळ्या स्थानिक प्रजातीच्या सुमारे ५५० रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, सचिन काकड, अभिषेक नेमाणे, प्रितम गायकवाड, वैभव म्हाकवेकर, अभि गिरप, पंकज केळुसकर, विठ्ठल सोकटे, निशा आळवे, श्वेता रेडकर, प्रा. गायकवाड, बॅ. खर्डेकर कॉलेजचे ५८ बटालियन तसेच नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. येणाऱ्या कालावधीत शहरातील कंपोस्ट डेपो, वेंगुर्ले स्टेडियम तसेच इतर मोकळ्या जागा आदी ठिकाणी अडीच ते ३ हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प असल्याचे मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांनी सांगितले.
------------
38381
वेंगुर्ले ः कॅम्प येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना एम. के. गावडे. शेजारी इतर.

वेंगुर्लेतील गुणवंतांचा राष्ट्रवादीतर्फे गुणगौरव
वेंगुर्ले ः तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुणगौरव करण्यात आला. कॅम्प येथील महिला काथ्या कारखान्यामध्ये झालेल्या या गुणगौरव कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे, राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, महिला काथ्या कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मकरंद परब, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी नगरसेवक वामन कांबळे, सचिन शेट्ये, स्वप्निल रावळ, प्रदिप सावंत, अष्टविनायक सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले पत्रकार दाजी नाईक आणि सदस्य म्हणून निवड झालेले पत्रकार दीपेश परब यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रज्ञा परब, नम्रता कुबल यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान साटेलकर यांनी तर आभार मकरंद प्ररब यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80559 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..