मंडणगड - दिव्यांग रुपेश पवारांची दोन एकरात भात लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - दिव्यांग रुपेश पवारांची दोन एकरात भात लागवड
मंडणगड - दिव्यांग रुपेश पवारांची दोन एकरात भात लागवड

मंडणगड - दिव्यांग रुपेश पवारांची दोन एकरात भात लागवड

sakal_logo
By

-rat25p14.jpg
38416
ः विन्हे ः दिव्यांग रूपेश पवार आपल्या शेतात चारसूत्री पद्धतीने भातलावणी करताना.
----------------
दिव्यांगाला शेतीची आवड; दोन एकरांत भातलागवड

रूपेश पवारकडून चारसूत्री पद्धतीचा अवलंब; विक्रमी उत्पादन घेण्याचा संकल्प; भातपीक स्पर्धेत सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ ः दिव्यांग असूनही आपल्या शेतीत विविध प्रयोग यशस्वीपणे राबवणारे तालुक्यातील विन्हे गावातील प्रगतीशील शेतकरी रूपेश पवार यांनी यंदा दोन एकर क्षेत्रावर भातलावणी केली आहे. शेतात चारसुत्री पद्धतीचा अवलंब करत दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रमी उत्पादन घेत विविध स्तरावरील भातपिक स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून तालुक्याचा नावलौकिक वृद्धिंगत करण्याचा संकल्प त्यांनी या निमित्ताने केला आहे.
विविध कारणांनी शेती सोडून देण्याचे काम तालुकावासीय करत असताना रूपेश पवार हे स्वतः पायाने दिव्यांग असतानाही कुटुंबीय व मित्रमंडळीच्या मदतीने आपल्या शेतात भाजीपाला, हळद लागवड, फळ लागवड असे विविधांगी लागवडीतून आर्थिक सोर्स निर्माण करत आहेत. आपल्या दिव्यांगपणाचा कोणताही बाऊ न करता अथक परिश्रम आणि कष्टाने त्यांनी केलेले विविध प्रयोग हे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच पथदर्शी आहेत.
...
चौकट
यंदाही विक्रमी उत्पादन घेणार..
दोन एकराच्या शेतीत इंद्रायणी वाणाची निवड करत चारसूत्री पद्धतीने भातलागवड केली आहे. शेती करताना यांत्रिकीकरणावर भर देत यंदा युरिया या खताऐवजी गिरीपुष्पचा वापर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रमी उत्पादन घेण्याकरिता शेतीचे योग्य पद्धतीने नियोजन केलेले असल्याचे त्यांनी सांगितले. या कामी घरातील सर्व सदस्य व मित्रमंडळी यांच्यासह कृषी सहाय्यक श्रीकांत कोठले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80574 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..