रत्नागिरी-‘नवोदय’च्या यादीत जि. प. शाळांच्या विद्यार्थ्यांचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-‘नवोदय’च्या यादीत जि. प. शाळांच्या विद्यार्थ्यांचा डंका
रत्नागिरी-‘नवोदय’च्या यादीत जि. प. शाळांच्या विद्यार्थ्यांचा डंका

रत्नागिरी-‘नवोदय’च्या यादीत जि. प. शाळांच्या विद्यार्थ्यांचा डंका

sakal_logo
By

L38426ः संग्रहीत
...
विद्यार्थी गुणवाण; नवोदयमध्ये स्थान

जिल्हा परिषद मुलांची गुणवत्ता सिध्द; नवोदयच्या यादीत ४८ विद्यार्थी; शिष्यवृत्तीत ११० चमकले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील मुले मागे पडू नये आणि मुलांना स्मार्ट’ बनवण्यासाठी मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाने गुणवत्ता कक्ष सुरू केला. त्याचेच फलीत म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेनंतर आता नवोदयच्या परीक्षेत जिल्हा परिषद शाळांमधील मुलांचा डंका वाजला आहे. शिष्यवृत्ती यादीत ५६ वरून ११० तर नवोदयच्या यादीत ९ वरून ४८ वर संख्या गेली आहेत. नवोदयमध्ये मोठ्याप्रमाणात प्रथमच मुलांचा सहभाग असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी सखोल ज्ञान देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी गुणवत्ता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय जि. प. प्रशासनाने घेतला होता. यासाठी तत्कालीन शिक्षण सभापती दीपक नागले, माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्यासह माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आवाज उठवला होता. त्याचेच फलीत म्हणजे गुणवत्ता कक्ष होय. याद्वारे स्पर्धा परीक्षा हेच लक्ष्य ठेवून हा उपक्रम राबवण्यात आले. गुणवत्ता कक्षाचा परिणाम सध्या दिसू लागला आहे. शिष्यवृत्तीसह नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत जिल्हा परिषद शाळांमधील मुलं झळकली आहेत. यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ११० मुलं यादीत झळकली असून गतवर्षी हा आकडा ५६ होता. दुप्पट विद्यार्थी चमकले असून भविष्यात शंभर टक्केचे लक्ष ठेवण्यात आले आहे. नवोदय विद्यालयासाठीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. परजिल्ह्यातील तसेच खासगी शाळेतील मुलांची संख्या या शाळेत जास्त होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध बैठकांमध्ये हा विषय वारंवार वादाचाही ठरला होता. तत्कालीन अध्यक्ष विक्रांत यांच्यासह सीईटो डॉ. जाखड यांनी स्वत: लक्ष दिले होते. नवोदयच्या परिक्षेत ८० विद्यार्थी बसलेले होते. त्यातील ४८ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतील आले आहेत. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण फक्त ९ होते. यावरून स्पर्धा परीक्षांमध्ये जि.प.चा डंका वाजला आहे.
---
चौकट
गुणवत्ता कक्षाने केले असे नियोजन
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी त्यासाठी विशेष नियोजन केले. स्पर्धेत टिकून राहतील असे विद्यार्थी बनवणे, परीक्षांसाठी आत्मविश्वास निर्माण करणे, स्पर्धा परीक्षेबाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवणे, प्रत्येक विद्यार्थ्याला खात्रीपूर्वक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, वर्गनिहाय आधुनिक शैक्षणिक साहित्य देणे, प्रत्येक आठवड्याला सराव पेपर घेणे असे उपक्रम राबवले गेले. यासाठी उपशिक्षणाधिकारी एस. जे. मुरकुटे, संदेश कडव यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना प्राथमिक शिक्षण अधिकारी वामन जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
...
एक नजर..
शिष्यवृत्ती परीक्षेत यादीत झळकलीः ११० मुलं
नवोदयच्या यादीत संख्या गेलीः ४८ वर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80582 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..