रत्नागिरी-धनगर समाजाला नेतृत्वाची संधी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-धनगर समाजाला नेतृत्वाची संधी द्या
रत्नागिरी-धनगर समाजाला नेतृत्वाची संधी द्या

रत्नागिरी-धनगर समाजाला नेतृत्वाची संधी द्या

sakal_logo
By

धनगर समाजाला नेतृत्वाची संधी द्या

भगवान शिंदेंची मागणी; नारायण राणेंची घेणार भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः कोकण विभागातील धनगर समाजाला विधानपरिषद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष, उपाध्यक्षपदी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर संधी द्यावी, अशी मागणी अखिल धनगर समाज महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष तथा कोकण धनगर समाजनेते भगवान शिंदे यांनी केली आहे. केंद्रात सत्ता असलेल्या भाजप सरकारकडून हे शक्य असल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची लवकरच भेट घेण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. या जागा राज्यपाल नियुक्त करतात. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष पद रिक्त आहे. जिल्हा नियोजन समिती निमंत्रित सदस्य निवडदेखील पालकमंत्री निवड झाल्यानंतर होणार आहे. या ठिकाणी प्रस्थापित राज्यकर्त्यांनी कोकणातील धनगर समाजाला संधी द्यावी, अशी मागणी अखिल धनगर समाज महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी केली आहे. कोकणातील धनगर समाज नेतृत्वाला महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर, महामंडळावर जिल्हा नियोजन समिती सदस्य पदावर संधी मिळावी, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80585 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..