
रत्नागिरी- निधन वृत्त
-rat२५p१९.jpg
L३८४२१
- स्नेहलता नेने
------------
शिक्षिका स्नेहलता नेने
रत्नागिरी, ता. २५ ः शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील रहिवासी आणि नगरपालिकेच्या शाळेच्या निवृत्त शिक्षिका स्नेहलता सुधाकर नेने (वय ७८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिवंगत तहसीलदार सुधाकर नेने यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे मुलगे, सुना, नातवंडे, मुलगी, जावई असा परिवार आहे.
--------
-rat२५p२०.jpg
38422
- सुभाष नागवेकर
--------------
सुभाष नागवेकर यांचे निधन
रत्नागिरी ता. २५ ः हातिस गावचे सुपुत्र, राष्ट्रीय कबड्डीपट्टू सुभाष बाळकृष्ण नागवेकर (वय ७६) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सन १९६० च्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हुतूतू-कबड्डीचे सामने भरवले जात असत. त्यात ते हिरीरिने भाग घेत. १९६१ मध्ये बाबरशेख क्रीडा मंडळाची स्थापना हातिसकर वाडी, प्रभादेवी, मुंबई येथे झाली होती. त्यांच्यामार्फत बाबरशेख कबड्डी संघ अनेक ठिकाणी खेळवला जात होता. ते १५ ते १६ वर्षे या संघाचे कर्णधार होते. या संघात सुभाषभाऊंचे वर्चस्व होते. मुंबई जिल्हा कबड्डी असोशिएन्सतर्फे होणान्या सामन्यात त्यांच्या नेतृत्वाखालील कबड्डी संघ नेहमीच आघाडीवर होता. अनेक वर्षे बाबरशेख कबडी संघाने अंतिम फेरीपर्यंत अनेकठिकाणी विजयी होण्याचा मान मिळवला होता. त्यात सुभाष नागवेकर यांचा सिंहाचा वाटा होता. ते क्रॉम्प्टन कंपनी आणि स्टॅंडर्ड मिलच्या सेवेत असताना त्या संघातून खेळत. त्यांच्या मागे तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80593 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..