‘एसटी’ची ग्रामपंचायतींना साद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एसटी’ची ग्रामपंचायतींना साद
‘एसटी’ची ग्रामपंचायतींना साद

‘एसटी’ची ग्रामपंचायतींना साद

sakal_logo
By

38441
मालवण ः आगार व्यवस्थापकांनी ग्रामपंचायतींना पाठवलेले पत्र.

‘एसटी’ची ग्रामपंचायतींना साद

मालवण आगार; भारमान वाढविण्यासाठी मागितली मदत

ओरोस, ता. २५ ः एसटी फेऱ्या सुरू करूनही पुरेसे भारमान मिळत नसल्याने मालवण आगार व्यवस्थापकांनी थेट ग्रामपंचायतींना पत्र पाठवत प्रवाशी वाढविण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायतीने नागरिकांना एसटीने प्रवास करण्यास आवाहन करण्याचे यात नमूद केले आहे. त्यामुळे मालवण आगाराचा हा पत्र प्रपंच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी कोरोनामुळे एसटीवर आलेली अवकळा अद्याप दूर झालेली नाही. कोरोना कालावधीत एसटी बंद असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्ग स्विकारला होता. एसटी प्रशासनाने जिल्ह्यात एप्रिलपासून एसटी फेऱ्या सुरू केल्या. परंतु, एसटीला पुरेसे भारमान मिळत नसल्याने एसटी प्रशासन आर्थिक अडचणीत आले आहे. यावर एक उपाय म्हणून व प्रवाशांनी मोठ्या संख्येने पुन्हा एसटीने प्रवास करावा म्हणून मालवण आगार व्यवस्थापकांनी थेट ग्रामपंचायतला पत्र लिहीत नागरिकांना एसटीने प्रवास करण्यास आवाहन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगार व्यवस्थापकांचा पत्र प्रपंच चांगलाच चर्चेत आला आहे.
मार्च २०२० पासून बंद झालेली एसटी एप्रिल २०२२ मध्ये सुरू झाली. कोरोनामुळे बंद झालेली एसटी नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दीर्घ काळ काम बंद आंदोलन केल्याने बंद होती. परिणामी दोन वर्षात नागरिकांना एसटी अनुपलब्धतेमुळे एसटी प्रवासाची सवय मोडली होती. नागरिकांनी यासाठी पर्याय शोधला होता. मालवण आगाराने २१ एप्रिल २०२२ पासून एसटी फेरी सुरू केली. लांब पल्ल्याच्या एसटीसह ग्रामीण फेऱ्या सुद्धा सुरू केल्या आहेत. नियमित एसटी फेऱ्या सुरू करून पाच महिने उलटले तरी अपेक्षित भारमान मिळत नसल्याचे ग्रामपंचायतींना केलेल्या पत्र प्रपंचात मालवण आगार व्यवस्थापकांनी नमूद केले आहे.
अपेक्षित भारमान मिळत नसल्यास फेऱ्या बंद करण्याच्या सूचना राज्य परिवहन मंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्याचेही आगार व्यवस्थापकानी पत्रात नमूद केले आहे. यामुळे आपल्या स्तरावर नागरिकांना एसटीने प्रवास करण्याचे आवाहन करावे. यामुळे एसटीला अपेक्षित भारमान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
-----------
चौकट
एसटी आर्थिक अडचणीत
मालवण आगार व्यवस्थापकांनी ग्रामपंचायतशी केलेल्या पत्र व्यवहारावरून एसटी फेऱ्या तोट्यात चालवल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन वर्षापूर्वी प्रवाशांची तुटलेली नाळ अद्याप जोडली गेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लालपरी अजून आर्थिक अडचणीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80605 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..