आत्मकेंद्रितपणा सोडून संघटीत व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मकेंद्रितपणा सोडून संघटीत व्हा
आत्मकेंद्रितपणा सोडून संघटीत व्हा

आत्मकेंद्रितपणा सोडून संघटीत व्हा

sakal_logo
By

38494
कणकवली : येथील सकल हिंदू समाज जागरण अभियान अंतर्गत मेळाव्यात बोलताना आनंद मोंडकर.

आत्मकेंद्रितपणा सोडून संघटीत व्हा

आनंद मोंडकर : कणकवलीत सकल हिंदू समाज मेळावा

कणकवली, ता.२४ : हिंदू धर्मावर शेकडो वर्षापासून आक्रमणे होत आहेत. इतिहासातून सर्वांनी बोध घ्यावा. आपण आणि आपल्‍या कुटुंबापुरताच विचार न करता सकल हिंदू समाजाच्या प्रगतीसाठी, धर्मासाठी संघटीत व्हा, असे आवाहन हिंदू जनजागरण समितीचे आनंद मोंडकर यांनी केले.
हॉटेल उत्कर्षच्या सभागृहात आज सकल हिंदू समाजाचा मेळावा झाला. यावेळी श्री. मोंडकर बोलत होते. यावेळी माजी गटविकास अधिकारी मोहन सावंत उपस्थित होते. श्री. मोंडकर म्‍हणाले, देशातील नऊ राज्यांत हिंदू समाजावर सातत्‍याने अतिक्रमणे होत आहेत. त्‍या राज्‍यांमध्ये हिंदू बांधव अल्पसंख्य होत आहेत. विविध जाती, संप्रदाय, भाषांमध्ये विभागलेल्या आपणास धर्माचा भगवा झेंडाच एकत्र आणू शकतो. त्यासाठी धर्मशिक्षण घेऊन संघटीत होणे अत्‍यावश्‍यक झाले आहे.
डॉ. बापू करंबेळकर म्‍हणाले, ‘वसुधैव कुटुंबम्’ असा विचार करणारा आपला धर्म आहे. धर्माच्या पालनातून माणसावर संस्कार होत तो उन्नत होत जातो. स्वत:मधील दोष कमी करून देवत्वाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. रविंद्र ओंबळकर यांनी हिंदुंची सुरक्षितता आणि हिंदु सणांवरील आक्रमणे या विषयी मनोगत मांडले. डॉ.तुळशीराम रावराणे यांनी समान नागरी कायद्याची आवश्यकता स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.कोमल काकतकर यांनी केले. प्रतिभा करंबेळकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80681 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..