रत्नागिरी-द्विशताब्दीत वाचक संख्या साडेसात हजाराचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-द्विशताब्दीत वाचक संख्या साडेसात हजाराचा संकल्प
रत्नागिरी-द्विशताब्दीत वाचक संख्या साडेसात हजाराचा संकल्प

रत्नागिरी-द्विशताब्दीत वाचक संख्या साडेसात हजाराचा संकल्प

sakal_logo
By

जिल्हा नगर वाचनालय---लोगो
.........
-rat२५p३४.jpg
३८४६८
- रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय
---------------
द्विशताब्दीत वाचक संख्या साडेसात हजार करणार

अॅड. पटवर्धन यांची माहिती; विद्यार्थी, अधिकाऱ्यांसह कर्मचारी केंद्रस्थानी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ते रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाची द्विशताब्दी या कालावधीत वाचक सभासद संख्या साडेसात हजार करण्याचा संकल्प वाचनालयाने केला आहे. युवा, विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रथम टप्यात केंद्रस्थानी ठेवून हे अभियान सुरू केले जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापासून करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा या अभियानात सक्रिय सहभाग घेत असताना द्विशताब्दीनजीक आलेल्या, ग्रंथसंपदेने समृद्ध असलेल्या वाचनालयाची १६०० वाचक संख्या साडेसात हजारपर्यंत वाढवण्याचा संकल्प केला आहे. सन १८२८ पासून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे वेगवेगळ्या नावाने ग्रंथसंपदा जोपासण्याचे काम करत आहे. रत्नागिरीचे सांस्कृतिक केंद्र म्हणून आपली ओळख वाचनालयाने निर्माण केली, असे अॅड. पटवर्धन म्हणाले.
रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा उन्नत ठेवण्याचे काम वाचनालयाने सातत्याने केले. रत्नागिरीतील अनेक मान्यवर व्यक्तिमत्वांनी आपापल्या कारकिर्दीत रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालायला अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. युवा पिढी, बालवाचक, मध्यमवयीन, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वर्गातील स्त्री, पुरुष वाचकांना वाचनालयाचे वाचक सभासद होण्यासाठी आवाहन करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले.
वाचकसंख्येचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्व व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, रत्नागिरीतील विविध संस्था त्यांचे सभासद, गृहनिर्माण संस्था त्यांचे सभासद, निवृत्तीधारक त्यांच्या संस्था, विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक विषयांशी निगडित संस्था, ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार या सर्वांना संपर्क करून वाचनालयाच्या समृद्ध ग्रंथसंपदेचा आस्वाद घेऊन आपल्या व्यक्तिमत्व विकासाला अधिक संधी प्राप्त करून घेण्यासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे.
--------------
चौकट १
पुस्तके घालताहेत साद
महाराष्ट्रातील सर्वात जुने मात्र अद्ययावत वाचनालय वाचक सभासद होण्यासाठी साद घालत आहे. नव्या-जुन्या प्रत्येक विषयावर आधारित उपलब्ध पुस्तक असलेले हे वाचनालय उत्कृष्ट दर्दी वाचकांच्या अव्याहत आगमनाची नेहमीच वाट पाहत आहे. वाचकांच्या स्वागतासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आतूर आहे. वाचक सभासद व्हावे, असे आवाहन अॅड. पटवर्धन यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80685 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top