वेंगुर्लेतील २५ टक्के पाणी दूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेतील २५ टक्के पाणी दूषित
वेंगुर्लेतील २५ टक्के पाणी दूषित

वेंगुर्लेतील २५ टक्के पाणी दूषित

sakal_logo
By

वेंगुर्लेतील २५ टक्के पाणी दूषित

स्थिती चिंताजनक; वैभववाडीतही प्रमाण जास्त

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २५ ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दूषित पाण्याचे प्रमाण १०.१९ टक्के आहे. वेंगुर्ले तालुक्यात २५ टक्के आणि वैभववाडी तालुक्यात १९.१५ टक्के असे सर्वाधिक दूषित पाणी असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. याबाबतची वेळीच कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात जून अखेर तपासण्यात आलेल्या ग्रामीण भागातील एकूण १०२१ पाणी नमुण्यापैकी १०४ पाणी नमूने दूषित आढळले आहेत. हे प्रमाण सरासरी १०.१९ टक्के एवढे आहे. पावसाळा सुरु झाल्याने दूषित पाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकुण १०२१ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १०४ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात सरासरी १०.१९ टक्के एवढे दूषित पाण्याचे प्रमाण असून सर्वाधिक वेंगुर्ले तालुक्यात २५ व वैभववाडी तालुक्यात १९.१५ टक्के पाणी नमुने दूषित आढळून आले असून ही बाब चिंताजनक असल्याची माहिती डॉ. खलीपे यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या मदतीने पाणी नमुने तपासण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या जलदूतांमार्फत दर महिन्याला काही ठराविक भागातील पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्यानंतर प्रयोगशाळेत या पाणी नमुन्यांची तपासणी करून हे पाण्याचे स्रोत पिण्यायोग्य आहेत? की अयोग्य? याबाबतचा अहवाल प्रयोगशाळेमार्फत देण्यात येतो. पाणी नमुने दूषित आढळून आल्यास ते जलस्रोत शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. दुषित पाण्यावर शुद्धिकरण प्रक्रिया केल्यानंतर पाणी पिण्यायोग्य आहे? की नाही? हे पाहण्यासाठी पुन्हा नमुने तपासण्यात येतात. त्यानंतरच पिण्यासाठी पाणी वापरले जाते. मात्र, जिल्ह्यातील शहरी भागात दूषित पाणी नसले तरी ग्रामीण भागातील दूषित पाण्याचे प्रमाण पहाता वेळीच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. न पेक्षा हे दूषित पाणी जलजन्य अजाराचे कारण ठरू शकते. त्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागाने एकत्रित ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत.
------------
चौकट
तपासण्या वाढविणे आवश्यक
जिल्ह्यात सुमारे ५ हजारहुन अधिक सार्वजानिक पाण्याचे स्रोत आहेत. मात्र, त्यापैकी २५ टक्केही पाणी नमूने एकाच वेळी तपासले जात नाहीत. ही संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच पाणी दूषित होण्यामागची कारणे काय आहेत हे तपासून त्यावर वेळीच उपाययोजना झाल्या पाहिजेत. तरच दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
---------------
तालुक्यातील दूषित पाण्याचे प्रमाण
*तालुका*तपासलेले नमुने*दूषित नमुने
दोडामार्ग*२८*०
सावंतवाडी*१९७*२२
वेंगुर्ले*८८*२२
कुडाळ*१९६*२३
मालवण*११४*४
कणकवली*१८४*१५
देवगड*१२०*०
वैभववाडी*९४*१८
-------------
ग्रामीण भागात दूषित पाणी प्रमाण (टक्के)
सावंतवाडी-११.१७
वेंगुर्ले-२५
कुडाळ-११.७३
मालवण-३.५१
कणकवली-८.१५
वैभववाडी-१९.१५
दोडामार्ग-०
देवगड-०
-------------
कोट
जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असून या मागची कारणे शोधा व उपाय योजना करा. जास्तीत जास्त पाणी नमूने तपासणीला पाठविण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत.
- डॉ. महेश खलिपे, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80702 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..