चिपळूण ः धरणावर पर्यटकांना बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः धरणावर पर्यटकांना बंदी
चिपळूण ः धरणावर पर्यटकांना बंदी

चिपळूण ः धरणावर पर्यटकांना बंदी

sakal_logo
By

- RATCHL253.JPG-
38478
चिपळूण ः पर्यटकांना आकर्षित करणारे कळवंडे धरण ओसंडून वाहू लागले आहे.

कळवंडे धरणावर पर्यटकांना बंदी

ग्रामपंचायतीचा आदेश; दंडात्मक कारवाईचा देणार दणका

* धरण परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच
* धरणाच्या खालील बाजूच्या विहिरी दूषित
* पर्यटक डुबक्या मारतात तेच पाणी विहिरीत
* मोठ्या मगरीचा वावर हा सर्वात मोठा धोका

चिपळूण, ता. २५ ः कळवंडे धरणावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. येणाऱ्या पर्यटकांकडून येथे केवळ हुल्लडबाजी करून पाणी दूषित केले जाते. त्यामुळे कळवंडे ग्रामपंचायतीने धरणांवर येणाऱ्या पर्यटकांना मनाई केली आहे. बंदी कालावधीत ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि मनमोहक नजारा असलेल्या तालुक्यातील कळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. परिणामी, येथे धरणातील कोसळणाऱ्या धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे. अशातच धरण परिसरात मद्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे. शिवाय धरणाच्या खालील बाजूस अनेक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी आहेत. त्याचे पाणी दूषित होत आहे.
तालुक्यातील कळवंडेसह, अडरे, मोरवणे, खोपड, डेरवण आदी ठिकाणची छोटी धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. निसर्गाच्या नयरम्य कुशीत ही धरणे असल्याने पावसाळ्यात येथील वातावरण आल्हाददायक असते. त्यामुळे येथे तालुक्यातील अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह, मित्र-मैत्रिणीसह धाव घेत असतात. शनिवार, रविवार व सोमवारी या धरणांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. अनेकजण मद्यपान करून धिंगाणा घालतात. या धरणांवर कोणाचाही पहारा नसल्याने पर्यटक बिनधास्त असतात.
कळवंडे येथील धरणाच्या खालील बाजूस अनेक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी आहेत. पर्यटक जिथे डुबक्या मारतात तेच पाणी पाणी योजनांच्या विहिरीत जाते. त्यास परिसरातील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. येणारे पर्यंटक धरणाशेजारीच बिनधास्तपणे मद्यपान करतात. धरण परिसरात शेती करणाऱ्या महिलांना धरणाजवळून जावे लागते. धरण परिसरात मद्याच्या बाटल्यांचे ढीग पडले आहेत. याशिवाय धरणात मोठ्या मगरीचा वावर आहे. काहीजण येथे उंचावरून उडी टाकतात. ते धोकायक आहे. त्यामुळे कळवंडे ग्रामपंचायतीने धरणांवर येणाऱ्या पर्यटकांना मनाई केली आहे.
-------------------------------
चौकट
धरण परिसरात न येण्याचे आवाहन
येथे पर्यटकांना येण्यास कळवंडे ग्रामपंचायतीने मनाई लागू केली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसे पत्र ग्रामपंचायतीने पोलिस ठाण्यात दिले. त्यानुसार धरणाजवळ पोलिस गाड्या काही काळ फिरू लागल्या आहेत. पर्यटकांनी येथील धरण परिसरात येऊ नये, असे आवाहन कळवंडे ग्रामपंचायतीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80720 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top