क्रशर मालक कायद्याच्या कचाट्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रशर मालक कायद्याच्या कचाट्यात
क्रशर मालक कायद्याच्या कचाट्यात

क्रशर मालक कायद्याच्या कचाट्यात

sakal_logo
By

क्रशर मालक कायद्याच्या कचाट्यात

प्रदूषण नियंत्रणकडून नोटीसा; कळसुली, शिवडावच्या समस्येची दखल


कणकवली, ता.१२ : कळसुली व शिवडाव (ता.कणकवली) या दोन गावातील क्रशर चालकांना महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिस बजावली. तसेच सात दिवसांत नोटिशीचा खुलासा न केल्‍यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. येथील क्रशरमुळे नागरिकांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्‍यामुळे आमदार नीतेश राणे यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दिली होती.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने १९ जुलै रोजी कळसुली आणि शिवडाव या गावांतील क्रशर चालकांना नोटीस बजावली आहे. महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी याबाबत कारवाईचा इशारा दिल्‍याने जिल्ह्यातील क्रशर चालकांमध्ये तसेच राजकीय नेतेमंडळींमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पथकाने केलेल्‍या पाहणीत क्रशर परिसरात सामुग्री हाताळणी यासह लोडिंग, अनलोडींग यापासून निर्माण होणारी धूळ दाबण्यासाठी कव्हर व आणि पाणी शिंपडण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. क्रशिंग युनिट च्या बाजूला वाऱ्यापासून धुळीचा त्रास होऊ नये यासाठी भिंत अथवा अन्य कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्‍याचीही बाब पाहणी दरम्‍यान आढळली. यासह क्रशर परिसरात पथकाला अनेक त्रुटी आढळल्‍या आहेत. त्‍याबाबतचाही खुलासा महामंडळाने या क्रशर चालकांकडून मागवला असून विभागाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी या क्रशर मालकांना नोटीसा बजावल्या आहेत.
---
कोट
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपल्यावर का कायदेशीर कारवाई करू नये, असा प्रश्न संबंधित क्रशरधारकांना नोटिसीद्वारे विचारला आहे. यासंदर्भात क्रशर मालकांकडून खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अमित लाठे, माहिती क्षेत्र अधिकारी
--
आमदार राणेंच्या तक्रारीची दखल
क्रशरमुळे परिसरातील गावातील नागरिकांना होणारा त्रास पाहता आमदार राणे यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे क्रशरबाबत तक्रार केली होती. त्‍यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात क्रशर भागाची प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पथकामार्फत पाहणी केली होती. यावेळी योग्य व आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचा निष्कर्ष पाहणी दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने काढला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80727 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top