रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध
रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध

रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध

sakal_logo
By

38536
कळसुली : येथील खड्डेमय रस्त्यात वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करताना ग्रामस्थ.


रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध

कळसुलीतील अनोखे आंदोलन; राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते, विद्यार्थी, ग्रामस्थांनी वेधले प्रशासनाचे लक्ष


कणकवली, ता.२५ : कळसुली दिंडवणेवाडी (ता.कणकवली) येथील रस्ता खड्डेमय झाला आहे. निवेदने देऊनही खड्डेमय रस्त्यांची दुरूस्ती होत नसल्‍याने आज राष्‍ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद दिंडवणे केंद्र शाळा केंद्र नं. २ मधील विद्यार्थ्यांनी या खड्ड्यातच वृक्षारोपण केले. तसेच खड्डे न बुजविल्‍याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेधही केला.
कळसुली गावातील दिंडवणेवाडी ते आंब्रड फाटा हा दोन किलोमिटरचा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. यात काही ठिकाणचे खड्डे एक ते दीड फुटापर्यंत खोल असल्‍याने वाहन चालकांना त्‍याचा अंदाज येत नाही, त्‍यामुळे अपघात होत आहेत. तर पावसात खड्ड्यांमध्ये पाणी असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. विद्यार्थ्यांवर चिखलाचे पाणी अंगावर उडत असते. हा रस्ता कळसुली गावातून देंदोंनेवाडी प्रकल्पग्रस्तांकडे जोडणारा हा मार्ग आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे न बुजवल्यास राष्ट्रवादीतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आंदोलनावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चव्हाण, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भरत घाडीगावकर, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडीस, कुष्णा घाडीगावकर, तातू गावकर, सुहास घाडीगावकर, कृष्णा तावडे,तावडे, बाबू आंब्रडकर, काका कदम, ॲड गौतमी घाडीगावकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80740 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..