बनेंच्या वाढदिवसाला केले राजकीय व्यासपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनेंच्या वाढदिवसाला केले राजकीय व्यासपीठ
बनेंच्या वाढदिवसाला केले राजकीय व्यासपीठ

बनेंच्या वाढदिवसाला केले राजकीय व्यासपीठ

sakal_logo
By

बनेंच्या वाढदिवसाला केले राजकीय व्यासपीठ

आमदार सामंत; गीतेंचीच भूमिका शिंदेंनी पुढे नेली तर आम्ही गद्दार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : उदय बनेंच्या वाढदिवसाला त्यांनी मलाही निमंत्रण दिले होते. त्यांच्या मातोश्री तिथे होत्या. हे राजकीय व्यासपीठ नव्हते. परंतु काही लोकांना व्यासपीठ मिळत नाही, म्हणून त्यांनी माझ्यासह योगेश कदम रायगड येथील नेत्यांवर टीका केली, असा टोला आमदार उदय सामंत यांनी माजी खासदार अनंत गीते यांना लगावला.
उदय सामंत म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी अनंत गीते यांनी खेडमध्ये घेतलेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सेनेला संपवतय. राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊ नका काम करू नका, असे जाहिर वक्तव्य गीतेंनी केले होते. घटकपक्षाविरोधात पहिली भूमिका गीतेंनी मांडली. मग ते गद्दार आहेत का? तर त्यांनी त्यांची भूमिका अशी भूमिका मांडली. तेव्हा ती भूमिका रास्त होती. पण गीतेंचीच भूमिका एकनाथ शिंदेंनी पुढे नेली तर आम्ही गद्दार ठरलो. आमच्यावर टीका करून काही उपयोग नाही. कारण आम्ही शिवसेनेतच आहोत, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. घटक पक्ष सेनेला संपवतोय, हे तेव्हा त्यांनी मान्य केले. मग ते गद्दार आहेत का. पवारांबरोबर राहू नका, बाळासाहेब ठाकरे आपले नेते आहेत, शरद पवार नाही. राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन काम करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला होता. तेव्हा पवारांबद्धल त्यांनी केलेल्या शब्द प्रयोग मी आता करणार नाही. तेवढे संस्कार माझ्यावर झाले आहेत. गीतेंचीच भूमिका एकनाथ शिंदेंनी पुढे नेली तर आमच्यावर टीका सुरू झाली.
आम्ही अजून शिवसेनेत आहोत, म्हणून न्यायालयात हा विषय सुरू आहे. पण आता वेगळा संभ्रम निर्माण केला जात आहे की, आम्ही मनसे, भाजपमध्ये जात आहोत. पण असे कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही. रत्नागिरीत जो मेळावा झाला, त्याला मी महत्त्व देत नाही. जी आम्ही भूमिका घेतली, त्याचे लवकरच सर्व समर्थन करतील. म्हणून मी अजून काही बोललो नाही.
------------------------
चौकट
परस्पर विरोधी सूचना
दापोलीत योगेश कदमांना ताकद द्यावी, अशा सूचना आम्हाला आधी आल्या होत्या. दीड महिन्यानंतर त्याच्या विरोधात जाण्याच्या सूचना आल्या. ज्यांनी हा वाईट निर्णय घेतला, ते बाजूला राहिले आणि मी वाईट झालो. परंतु त्यामागे एक वेगळी ताकद आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80767 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..