कसाल मतदारसंघ सेना विभागप्रमुखपदी कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसाल मतदारसंघ सेना विभागप्रमुखपदी कदम
कसाल मतदारसंघ सेना विभागप्रमुखपदी कदम

कसाल मतदारसंघ सेना विभागप्रमुखपदी कदम

sakal_logo
By

38575
कसाल ः नवनियुक्त पदाधिकारी सचिन कदम, संदीप सावंत यांचे अभिनंदन करताना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक आदी.

कसाल मतदारसंघ सेना
विभागप्रमुखपदी कदम
ओरोस, ता. २५ ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी नव्याने स्थापन झालेल्या कसाल जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विभागप्रमुख पदी सचिन कदम व विभाग संघटकपदी संदीप सावंत यांची नेमणूक झाली.
कसाल विभागात संघटनात्मक बांधणी करून शिवसेनेची ताकद वाढविण्याचे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला साजेसे काम करणार असल्याचे यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, माजी उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, रुपेश पावसकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, अवधूत मालणकर, छोटू पारकर, बाळा कांदळकर, डॉ. बालम, पप्पू पालव, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक अनुराग सावंत, रानबांबुळी सरपंच वसंत बांबूळकर, कुंदे उपसरपंच सुशील परब, हरी वायंगणकर, विरेश परब, संतोष शिरवणकर, सुनील सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80789 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top