
माजी खासदार राणे उद्या माणगाव दौऱ्यावर
swt२६२.jpg
३८६११
निलेश राणे
माजी खासदार निलेश राणे
उद्या माणगाव दौऱ्यावर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ः भाजपचे माजी खासदार निलेश राणे गुरुवारी (ता. २८) माणगाव दौऱ्यावर येणार आहेत. युवा नेते आणि युवा उद्योजक विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गच्या वतीने माणगाव खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटपाचा कार्यक्रम माणगाव येथील राधाकृष्ण नाट्य मंगल कार्यालय सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.
''पुन्हा एकदा आमचे नेते निलेश राणे साहेब, माणगाव खोऱ्याच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, स्वागत करूया आपल्या लाडक्या नेत्याचे'' या आशयाचे बॅनर सध्या जिल्ह्यात झळकू लागले आहेत. सकाळी ११ वाजता श्री. राणे यांचे श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात आगमन होणार आहे. यानंतर माणगाव हायस्कूलच्या इमारतीची पाहणी करणार आहेत. यानंतर माणगाव हायस्कूल येथील श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामीं महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. संस्था चालकांबरोबर महत्वपूर्ण बैठक होणार आहे. भौतिक सोयी सुविधांबाबत ते संस्थाध्यक्ष सगुण धुरी यांच्यासह सर्व संचालक मंडळाशी चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर ११.४५ वाजता राधाकृष्ण नाट्यमंदीर येथे त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर बारा वाजता माणगाव हायस्कूलच्या दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १०० टक्के निकाल लावणाऱ्या माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नुतन संस्थाचालक यांचाही सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर माणगाव हायस्कूलच्या तब्बल ५०० विद्यार्थी वर्गाला मोफत दप्तर वाटप करण्यात येणार आहे. माणगाव हायस्कूलला यापूर्वीच लाखो रूपये देवून आर्थिक मदत करणारा राणे कुटुंबीयांचे ऋण व्यक्त करून राणे यांचा सत्कार संस्थेच्या व शाळेच्यावतीने करण्यात येणार आहे. श्री. परब यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी दीड वाजता माणगाव येथील श्री दत्त मंदिरात ते दर्शन घेवून महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. परब, संस्थाध्यक्ष सगुण धुरी व मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80886 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..