स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा
स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा

स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा

sakal_logo
By

swt२६५.jpg
३८६१४
कवठीः सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र नाईक यांच्या सौजन्याने कवठी क्रमांक १ शाळेस शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा
देवेंद्र नाईकः कवठी शाळेस शैक्षणिक साहित्याचे वाटप वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना मुलांनी आव्हाने स्वीकारली पाहिजेत. परिस्थितीचा बाऊ न करता तिच्यावर मात करायला शिका. मिळालेल्या संधीचे सोने करायला शिका, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र नाईक यांनी कवठी शाळा क्रमांक १ येथे शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठी क्रमांक १ येथे चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवणचे मालक देवेंद्र नाईक यांनी शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य पहिली व दुसरीसाठी वह्या आणि उर्वरित वर्गांसाठी पॅड व इतर साहित्य असे शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सखी वारंग यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संजय चव्हाण यांनी केले. यावेळी श्री. नाईक यांच्या माध्यमातून या पूर्वी अनेक शाळा, सामाजिक संस्था, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिक सहकार्य मिळालेले आहे. नाईक यांनी आपल्या शाळेला शैक्षणिक सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याने प्रशालेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, आभारपत्र आणि स्मरणिका देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. नाईक म्हणाले, "मुलांनी जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावा. आपणही कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन इथपर्यंत पोचलेलो आहे. परिस्थितीचा बाऊ न करता तिच्यावर मात करायला शिका. मिळालेल्या संधीचे सोने करायला शिका." यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मनिष वाडयेकर, उपाध्यक्ष श्रीमती श्रीया योगी, संचिता फडके, सदस्य बाळकृष्ण गोरे, रुपेश खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ आणि माता पालक संघ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. अशाच प्रकारे यापुढेही सर्वांनी शाळेच्या विकासात मोलाचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केली. सूत्रसंचालन शिक्षक गुरुप्रसाद सावंत, आभार शिक्षक अनिल पाटकर यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80888 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..