बेशिस्त चालकांना आता दणकट दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त चालकांना आता दणकट दंड
बेशिस्त चालकांना आता दणकट दंड

बेशिस्त चालकांना आता दणकट दंड

sakal_logo
By

बेशिस्त चालकांना आता दणकट दंड

सुधारीत नियम; १० हजारापर्यंत खिशाला कात्री, परवाना निलंबनाचीही तरतूद

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः सुधारित मोटार वाहन कायद्यातील दंड व नियमांची अंमलबजावणी सिंधुदुर्गात सुरू झाली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना एक हजार ते दहा हजार रूपयापर्यंत दंड बसणार आहे. वाहतूक परवाना देखील निलंबित होणार आहे. आज मध्यरात्रीपासून या दंडाची अंमलबजावणी सुरू होत आहे. त्‍यामुळे वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावीत, असे आवाहन सिंधुदुर्ग वाहतूक पोलिस विभागाचे उपनिरीक्षक अरूण जाधव यांनी केले आहे.
राज्य शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्‍याने सर्वप्रकारच्या दंडात मोठी वाढ झाली आहे. या प्रामुख्याने परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता, आता ५००० रुपये करण्यात आला आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास पूर्वी सरसकट पाचशे रूपये दंड आकारला जात होता; परंतु आता प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळा दंड आकारला जाणार आहे.
राज्‍याने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रक्‍कमेत वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता; मात्र ‘ई’ चलान प्रणाली अद्ययावत झाली नव्हती. सिंधुदुर्ग वाहतूक विभागाकडील ‘ई’ चालन प्रणाली २६ जुलैच्या मध्यरात्रीपासून अद्ययावत करण्यात येत आहे. त्‍यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचा आता खऱ्या अर्थाने खिसा रिकामा होणार आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्‍ट्रात सुरू झाल्‍यानंतर वाहन चालकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्‍या होत्या; मात्र जानेवारी २०२२ पासून ठिकठिकाणी ‘ई’ चलान प्रणाली अद्ययावत करून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. सिंधुदुर्गात २६ जुलैपासून सुधारीत वाहतूक नियमानुसार दंडाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

पॉईंटर
वाहतूक खाते म्हणते...
- केंद्रीय कायद्याचा राज्यात अंमल
- ‘ई’ चलान प्रणाली अद्ययावत
- प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळा दंड
- नियम मोडल्यास खिसा रिकामा
- सिंधुदुर्गात २६ जुलैपासून नवे नियम
-------------
चौकट
...तर परवाना निलंबित
पूर्वी हेल्मेट नसल्यास ५०० रुपये दंड आकारला जात होता. यामुळे अनेक वाहनधारक दंड भरून निघून जात होते; परंतु आता दंडाच्या रकमेत वाढ केली नसली तरी तीन महिन्यासाठी वाहन परवाना निलंबित करण्याची तरतूद आहे. शिवाय, पीयूसी नसल्यास तीन महिन्यासाठी परवाना निलंबित केला जाणार आहे.
-------------
चौकट
सीटबेल्ट नसेल तर...
चालकाने सीटबेल्ट घातला नसल्यास १००० रुपये दंड आकारला जायचा; परंतु नव्या कायद्यात दंडाच्या रकमेत घट करून ती २०० रुपयावर आणली आहे.
-----------
पॉइंटर टेबल
*दंडाचा प्रकार*पूर्वी*आता
*विनापरवाना चालक*१०००*५०००
*फॅन्सी नंबरप्लेट*५००*१०००
*सूचनेचे उल्लंघन*५००*७५०
*अनधिकृत चालक*१०००*५०००
*परमिट नसल्यास*१०००*१०,०००
*पीयुसी नसल्यास*५००*१,०००
*वेगमर्यादेचे उल्लंघन (दुचाकी व तीनचाकी)*५००*१०००
*वेगमर्यादेचे उल्लंघन (मोटार)*५००*२०००
*वेगमर्यादेचे उल्लंघन (जड वाहन)*५००*४०००
*दुचाकीवर मोबाईल वापर *५००*१०००
*मोबाईल वापर (मोटार)*५००*२०००
*अपात्र चालक*५००*१०००
*भरधाव वाहन*५००*५०००
*वाहनात बदल*१०००*प्रत्येक बदलासाठी२०००
*विनानोंदणी वाहन चालविल्यास*५०००*१००००
*वाहनाबाहेर माल*२,०००*२०,०००
*विमा नसल्यास*१०००*प्रथम गुन्हा २०००, दुसरा ४०००
------------
कोट
अपघातांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने केंद्राने घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी केली आहे. ‘ई’ चलान प्रणाली अद्ययावत झाल्‍याने सिंधुदुर्गातही वाढीव दंड आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कारवाईमुळे बेशिस्तीचे प्रमाण कमी होईल. तसेच दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली असली तरी नियम पाळणाऱ्यांना दंडाची भीती बाळगण्याची गरज नाही.
- अरूण जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक विभाग, सिंधुदुर्ग
---
कठोर कायद्यामुळे असा फायदा
केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्‍याने बेशिस्त चालकांना चाप बसेल. गणेशोत्सवही महिन्यावर येऊन ठेपला असून कोकणात यावेळी जल्लोष असतो. कोरोना संकट टळल्याने यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या काही हुल्लडबाज पर्यटकांमुळे उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी वाहतूक खात्याचे हे नियम फायदेशीरच ठरतील. परिणामी उत्सव शांततेत होईल. अपघाताच्या घटनाही कमी होतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80892 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top