मंडणगड ः चार धरणे ओव्हरफ्लो; दोघांना दुरुस्तीचा खो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः चार धरणे ओव्हरफ्लो; दोघांना दुरुस्तीचा खो
मंडणगड ः चार धरणे ओव्हरफ्लो; दोघांना दुरुस्तीचा खो

मंडणगड ः चार धरणे ओव्हरफ्लो; दोघांना दुरुस्तीचा खो

sakal_logo
By

rat२६p१०.jpg
३८६२५
ः तुळशी ः तुडुंब भरून ओव्हरफ्लो झालेले तुळशी धरण. (सचिन माळी ः सकाळ छायाचित्रसेवा)
.......
चार धरणे तुडुंब, दोघांना दुरुस्तीचा खो

मंडणगड तालुका; तिडे, भोळवलीमुळे भारजेला पूर,
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २६ ः तालुक्यातील तुळशी, भोळवली, तिडे, व्याघ्रेश्वर ही मध्यम व लघु आकाराची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने चिंचाळी व पणदेरी धरणात सलग दुसऱ्या वर्षी पाणीसाठा नाही. तालुक्यात २६ जुलै पर्यंत मंडणगड तालुक्यात एकूण १७९० मि.मी. पावसाची नोंद झाली.
तालुक्यातील भोळवली धरण ६.९१, तुळशी धरण १.९६७, तिडे ७.५०७ दशलक्ष घनमीटर, भोळवली ६.९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे; मात्र या धरणांचे कालवे अपूर्णावस्थेत आहेत. महत्त्वाकांक्षी पाच धरणांच्या जलसाठ्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील १३४६ हेक्‍टर जमीन ओलिताखाली येऊन शेतीकरिता पाण्याचा वापर केला जाणे अपेक्षित आहे; मात्र अजूनही ते कागदावरच असल्याचे स्पष्ट आहे. भारजा, निवळी नद्या, नाले, ओढे प्रवाहित झाले आहेत. कडीकपाऱ्यातील धबधबे सक्रिय झाल्याने स्थानिक धबधब्यांच्या पाण्यात भिजून यथेच्छ आनंद लुटत आहेत. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, घोसाळे, पणदेरी घाटात रस्त्यांशेजारून सक्रिय झालेले अनेक नैसर्गिक लहान-मोठे धबधबे लक्ष वेधून घेत आहेत. याचबरोबर धरण परिसरातील दूरवर पसरलेले पाणी आकर्षण वाढवत आहे. चिंचाळी, कोकणमळा पारकुंड, वेसवी येथील धबधब्यांवर विशेष गर्दी दिसून येत आहे.
---------------------------
चौकट
चिंचाळी धरणाची भिंत दुरुस्ती
मंडणगड तालुक्‍यात १९७९ साली चिंचाळी हे पहिले धरण बांधण्याची सुरवात झाली. ४२ वर्षानंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. चिंचाळी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता २.१४ दशलक्ष घनमीटर आहे. धोकादायक बनलेल्या या धरणाच्या दुरुस्ती काम दोन वर्षांपासून सुरू असून ओव्हरफ्लो होऊन पाणीविसर्ग होणारी भिंत व माती काढून नवीन बांधकाम करण्यात येत आहे.
--------------------------------
चौकट
पणदेरी धरण नव्याने बांधणारगतवर्षी तुडुंब भरल्यानंतर गळती लागल्याने धोकादायक बनलेले पणदेरी धरण रिकामे करण्यात आले आहे. हे धरण पुन्हा नव्याने डीझाइन करून बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासकीय स्तरावर त्या संदर्भातील कार्यवाही करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80930 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..