संगमेश्वर ः मतदारसंघातही शिवसेना डळमळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः मतदारसंघातही शिवसेना डळमळीत
संगमेश्वर ः मतदारसंघातही शिवसेना डळमळीत

संगमेश्वर ः मतदारसंघातही शिवसेना डळमळीत

sakal_logo
By

टुडे पान 1
..
शिवसेना चिन्ह वापरावे
...........................
चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात राजकीय भूकंपाचे संकेत

शिवसेनेला धक्का बसणार?;संगमेश्वर तालुक्यात वादळापूर्वीची शांतता
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः राज्यात गेल्या दीड महिन्यात घडलेल्या विचित्र सत्तानाट्यानंतर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात कमालीची शांतता आहे; मात्र ही शांतता औटघटकेची ठरण्याची दाट शक्यता आहे. या मतदार संघात लवकरच राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून याचे धक्के अर्थातच शिवसेनेलाच बसणार हे स्पष्ट आहे.
आजवरचे सर्वात मोठे बंड करून एकनाथ शिंदे स्वपक्षाच्या तब्बल ४० आमदारांना सोबत घेत राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. भाजपने त्यांना साथ दिल्याने या सरकारकडे विधानसभेत पूर्ण बहुमत आहे. यामुळे शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. स्थानिक पातळीवर योगेश कदम आणि रत्नागिरी- संगमेश्वरचे आमदार उदय सामंत हे शिंदे गटात गेले आहेत. त्यांना संगमेश्वर आणि रत्नागिरीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेचा आमदार नसल्याने हा प्रश्न आलेला नाही. संगमेश्वर शिवसेनेने एक पदाधिकारी मेळावा घेत आम्ही ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दाखवले असले तरी यात केवळ पदाधिकारी होते; पण सर्वसामान्य शिवसैनिकांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. अशीच स्थिती चिपळूणमध्ये आहे. चिपळुणात तर उमेश सकपाळ यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरनंतर चिपळूण शिवसेनेत आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. या मतदार संघातील दोन्ही तालुक्यात असलेली ही शांतता वादळापूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. लवकरच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. यामुळे उमेदवारीवरून ही शांतताभंग होण्याची चिन्हे आहेत.
...
चौकट
शिंदे गटाला समर्थन देण्याच्या तयारीत..
संगमेश्वर शिवसेनेत याबबात कुणीही काहीही बोलायला तयार नाही. केवळ आम्ही पक्षपमुखांच्या पाठीशी असल्याचे सर्व सांगत आहेत. त्यामुळे पुढे नक्की काय? याचा उलगडा होताना दिसत नाही. अशा स्थितीत या मतदार संघातील एक माजी लोकप्रतिनिधी शिंदे गटाला समर्थन देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा लोकप्रतिनिधी संगमेश्वरातला की चिपळुणातला याबाबत अजूनही सुस्पष्टता झालेली नसली तरी तशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. असे घडल्यास या मतदार संघातही सेनेत फूट पडण्याची शक्यता आहे.
----------------
कोट
संगमेश्वर तालुक्यातील शिवसेना हि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. काही लोक गैरसमज पसरवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यात ते यशस्वी होणार नाहीत.
-प्रमोद पवार, तालुका प्रमुख शिवसेना , संगमेश्वर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80936 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top