
संगमेश्वर ः थांबा मिळण्यासाठीच्या 15 ऑगस्टच्या आमरण उपोषणाला वाढता पाठिंबा
रेल्वे चित्र वापरा
...
नेत्रावती, मत्स्यगंधेला संगमेश्वर थांबा
मिळण्यासाठीच्या उपोषणाला वाढता पाठिंबा
संगमेश्वर, ता. २६ ः नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर थांबा मिळवण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांनी एकजुटीने आयोजित केलेल्या १५ ऑगस्टच्या (स्वातंत्र्यदिनी) उपोषणाला सर्व स्तरातून प्रतिसाद वाढत आहे. या आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, पत्रकार, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, ग्रामविकास मंडळे व तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याची माहिती जिमन यांनी दिली.
निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुप समुहातर्फे समूहप्रमुख संदेश जिमन आणि सहकारी स्वातंत्र्यदिनी संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक परिसरात उपोषण करणार आहेत. कोकण रेल्वे प्रत्येकवेळी विविध रेल्वे आरक्षणाचे कोटे संगमेश्वर रोड स्थानकासाठी तिकीट आरक्षण संख्या कमी असल्याचा दावा करत आहे. या स्थानकात एकूण अप्-डाऊन अशा दहा गाड्या थांबतात; पण काही गाड्या अवेळी येत असल्याने प्रवाशांना आपल्या गावात जाण्या-येण्याचा त्रास असल्याने गैरसोयीचे ठरते. मनस्ताप तसेच आर्थिक भुर्दंडामुळे शेकडो प्रवासी त्रस्त आहेत. नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या दिवसाउजेडी येत असल्याने प्रवाशांच्या सोयीच्या ठरतील. त्यामुळे तमाम संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांच्यावतीने हे उपोषण करण्यात येणार आहे.
---------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80992 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..