
संगमेश्वर ः व्यावसायिक व ग्रामस्थांची संगमेश्वर महावितरण कार्यालयावर धडक
संगमेश्वरात वीजपुरवठा खंडितः लोगो
...
at२६p३८.jpg
38711
ः संगमेश्वर : संगमेश्वर येथील महावितरणला निवेदन देत असताना व्यापारी संघ.
....
महावितरणवर ग्रामस्थांची धडक
व्यापारी संघासह शिवसेना आक्रमक; अधिकाऱ्यांसह कर्मचारी धारेवर, निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः संगमेश्वर शहर आणि परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत संगमेश्वर व्यापारी संघ आणि शिवसेनेने आक्रमक होत वीजपुरवठा खंडित होण्याबाबत महावितरण कार्यालयात जाऊन संतप्त होत जाब विचारला. याबाबत संगमेश्वर महावितरण कार्यालयाला निवेदनदेखील देण्यात आले आहे .
या निवेदनात असे म्हटले आहे की, संगमेश्वर शहर व परिसरात वीजप्रवाह मागील सहा महिन्यांपासून सारखा खंडित होत आहे. त्यामुळे विजेवर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यवसायांचे नुकसान होत आहे. याबाबत जनजागृती करून ग्रामस्थांना माहिती दिली आहे का? अनियंत्रित वीजपुरवठ्याचे हे वीजसंकट कधी सुधारणार आहे? याबाबत विचारणा करण्यात आली. संगमेश्वरमध्ये बाजारपेठ आहे. बँक, पतसंस्था, बसस्टॅंड, दवाखाना, शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय आहेत अशावेळी इमर्जन्सी काही प्रकार झाला तर रात्री कोणीही कर्मचारी उपस्थित नसतो. अशावेळी ग्रामस्थांनी काय करायचे? त्या वेळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नंबर मिळावे. गेल्या वर्षी असाच प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा आपल्या येथे कोणीही कर्मचारी रात्रीच्यावेळी उपस्थित नव्हता. त्या वेळी देवरूखला राहणारा इथला कर्मचारी आल्यावर लाईन बंद करण्यात आली. या दरम्यान काही अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न विचारून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिवसेनेही निवेदन दिले आहे.
----------------------
चौकट
महावितरणकडून जनजागृती हवी
वीजबिलाबाबत महावितरणकडून जनजागृती करण्यात यावी. बिलांमध्ये कोणते चार्जेस लावण्यात येतात, याबाबत मार्गदर्शकाकडून सांगण्यात यावे. जास्त केव्हीच्या मोठ्या लाईनखाली असणाऱ्या सुरक्षित तारा गंजून तुटल्या आहेत त्या पुन्हा जोडल्या गेल्या नाहीत आणि वीजप्रवाह सुरू असणारी तार तुटली आणि अपघात झाल्यास महावितरण जबाबदारी घेणार का?
..
चौकट
कर्मचाऱ्यांचे फोन लागत नाहीत...
संपूर्ण संगमेश्वर बाजारपेठेत कमी वीजदाबाचा वीजपुरवठा होत आहे. त्याकडे लक्ष देणार आहात का? त्यासाठी मोठ्या पॉवरचे ट्रान्सफॉर्मर बसवून हा प्रश्न सुटणार आहे का? महावितरणाच्या बहुतांशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन लागत नाहीत, त्यावर आपण काही उपाय करणार आहात का, असे प्रश्न उपस्थित करत वीजप्रवाह आपणाकडून खंडित होणार असेल तर त्याची माहिती व्हॉटस्अॅप किंवा मेसेजद्वारे ग्राहकांना मिळावी, असेही या वेळी ठणकावण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81021 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..