
वेंगुर्लेतील शिबिरात 30 जणांचे रक्तदान
swt२६१७.jpg
३८७४५
वेंगुर्लेः रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील रेडकर, राजेश्वर उबाळे. सोबत आनंद बांदेकर, पंकज शिरसाट व इतर.
वेंगुर्लेतील शिबिरात ३० जणांचे रक्तदान
रोटरी क्लबचा पुढाकार ः कारगिल विजय दिनानिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २६ ः कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लेने येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लबचे इव्हेंट चेअरमन डॉ. राजेश्वर उबाळे, रोटरी क्लब वेंगुर्लेचे अध्यक्ष सुनील रेडकर, सचिव पंकज शिरसाट, सदस्य डॉ. आनंद बांदेकर, डॉ. वसंत पाटोळे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे महेश राऊळ, रोटरी क्लबचे मृणाल परब, योगेश नाईक, राजू वजराटकर, डॉ. रीना उबाळे, श्री. गावडे, ओरोस रक्तपेढीचे कर्मचारी आदी उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
अध्यक्षीय मनोगतात श्री. रेडकर म्हणाले यांनी, आजची युवापिढी ही देशाची शान आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांत युवापिढीने सहभाग दर्शवून गावोगावी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. जेणेकरून जिल्ह्याला रक्ताचा तुटवडा भासणार नाही, असे सांगत या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित दर्शविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. उबाळे म्हणाले की, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान करण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घ्यावयास हवा. आपले रक्त दिल्यामुळे एखाद्या रुग्णाचा जर प्राण वाचविला जाऊ शकतो. आजच्या पिढीने रक्तदानाविषय़ी जनजागृती करून गावोगावी अशा प्रकारची शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन केले.
या शिबिरात येथील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी, होमिओपथी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, रोट्रॅक्ट क्लब व अन्य संस्थांचे प्रतिनिधी मिळून एकूण ३० जणांनी रक्तदान केले. रोटरी क्लबचे पदाधिकारी योगेश नाईक, राजू वजराटकर, मृणाल परब यांनीही रक्तदान केले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. उबाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पंकज शिरसाट यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी संजीवनी हॉस्पिटलचे कर्मचारी, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लबने परिश्रम घेतली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81023 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..