सावंतवाडी चोरीप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी चोरीप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी
सावंतवाडी चोरीप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

सावंतवाडी चोरीप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

sakal_logo
By

सावंतवाडी चोरीप्रकरणी
संशयितास पोलिस कोठडी
सावंतवाडी, ता. २६ : शहरात झालेल्या चोरी प्रकरणातील संशयित सचिन राजू माने (वय ३०) याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याने चोरी केलेली घरे दाखविली; मात्र चोरीतील ऐवज कुठे ठेवला, त्याचे अन्य साथीदार याबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिल्याचे सावंतवाडी पोलिसांनी सांगितले.
सावंतवाडी शहरात १६ ते २३ जून या कालावधीत बंद घरे फोडून चोरट्याने चोरी केली होती. मालवणातही त्याने चोरी केली होती. मालवण पोलिसांनी सोलापूर येथून त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. काल त्याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेत चोरी घडलेल्या ठिकाणांवर नेऊन तपास केला; मात्र अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली. त्यानुसार त्याला पोलिस कोठडी दिली. पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81026 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..