५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५

sakal_logo
By

rat२६p२५.jpg
L38638
रत्नागिरी : दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्याकडे चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे मदतीचा धनादेश देताना श्रीनिवास जोशी. सोबत मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक.
.....
दामले विद्यालयास चित्पावन
मंडळातर्फे १० हजारांची मदत
रत्नागिरी, ता. २६ : शहरामध्ये दामले पॅटर्न यशस्वीपणे प्रस्थापित करणाऱ्या रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १५ म्हणजेच दामले विद्यालयाला अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाने दहा हजार रुपयांचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. पालिकेच्या शाळांमध्ये नेहमीच अव्वल असलेली आणि यंदाच्या वर्षी विक्रमी पटसंख्या पटकावणाऱ्या दामले विद्यालयास ‘शैक्षणिक उठावां’तर्गत गरजेची वस्तू अथवा शालेय साहित्य, विद्यार्थ्यांसाठी साधने खरेदी करण्यासाठी चित्पावन मंडळाने ही मदत देऊ केली आहे. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांनी चित्पावन मंडळाचे विशेष आभार मानले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दामले विद्यालयाचा चेहरामोहरा गेल्या पाच वर्षांत बदलून गेला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, बीडीएस परीक्षांसह अनेक परीक्षांमध्ये या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. शिक्षकांनी सुसंस्कारित विद्यार्थ्यांची पिढी घडवली पाहिजे. याकरिता शाळेतील सर्व शिक्षक योगदान देत असल्याबद्दल चित्पावन मंडळानेही या शिक्षकांचे कौतुक केले. याप्रसंगी शिक्षिका मंजिरी लिमये, जुलेखा काझी, योगेश कदम यांच्यासह चित्पावन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सदस्य अनंत आगाशे, मोहन पटवर्धन आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81027 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top