
राजापूर ः दरड प्रतिबंधक उपाय तातडीने आवश्यक
rat२६p३६.jpg
३८६८०
ः राजापूर ः अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून घाटरस्ता बंद होतो.
.....
दरड कोसळण्यावर हवेत प्रतिबंधात्मक उपाय
अणुस्कुरा घाट धोकादायक; प्रवाशांवर सतत टांगती तलवार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः गेल्या काही वर्षामध्ये अतिवृष्टीमध्ये अणुस्कुरा घाटामध्ये मोठमोठ्या दगडी आणि दरडी कोसळून मार्ग बंद होण्याच्या घटना घडल्या असून, यावर्षीही त्याची पुनरावृत्ती झाली. गत आठवड्यात एकाच ठिकाणी दोनवेळा दरड आणि मातीसह मोठे दगड कोसळले. सद्यःस्थितीमध्ये अनेक ठिकाणच्या दरडी, डोंगर परिसर आणि सुळक्यासारखे उंच असलेले मोठमोठ्या दगडी धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्या कोसळण्यापूर्वी रोखण्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे. अन्यथा, कोकणाला घाटमाथ्या पसिराला जोडणारा मार्ग असलेला अणुस्कुरा घाटातील प्रवास असुरक्षित ठरणार आहे.
या घाटातील रस्त्यामुळे राजापूर तालुका घाटमाथ्यावरील भागाशी जोडला गेला आहे. या मार्गाने कमी कालावधीमध्ये घाटमाथ्यावरील भागामध्ये जा-ये करणे सहज शक्य होते. त्यामुळे वाहन चालकांकडून या मार्गाला प्राधान्य दिले जात असून त्यातून या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. घाटातील उंच डोंगर भागाची कटाई करून नागमोड्या वळणांचा हा निमर्नुष्य रस्ता तयार केला आहे. या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंचच्या डोंगर, उभ्या रषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी ठिकठिकाणी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. गेल्या काही वर्षामध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये धोकादायक दरडी, मोठमोठे दगड आणि माती पडून रस्ता काही काळापुरता बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती गतवर्षी झाली होती. त्यामध्ये तब्बल आठ ठिकाणी भूस्खलन झाले होते. या वर्षीही एकाच ठिकाणी दोनवेळा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. भविष्यामध्ये धोकादायक दरडी वा मोठे दगड कोसळून हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी सखोल सर्व्हेक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास भविष्यामध्ये कोकणाला घाटमाथा परिसराला जोडणारा हा शॉर्टकट मार्ग प्रवासाच्यादृष्टीने असुरक्षित ठरणारा आहे.
......
एक नजर...
*कोकण आणि घाटमाथा परिसर जोडणारा
*नागमोड्या वळणांचा नऊ कि.मी.चा मार्ग
*धोकादायक दरडी, उंच सुळक्यासारखे दगड
*ठिकठिकाणी दर्जेदार उपाययोजनांची गरज
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81032 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..