
रत्नागिरी- रोजच्या व्यवहारात पंचांग बघणे आवश्यक
rat26p26.jpg-
38639
रत्नागिरी : चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे आयोजित पंचांग कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पं. गौरव देशपांडे. शेजारी वेदमूर्ती भूषण जोशी.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
रोजच्या व्यवहारात पंचांग बघणे आवश्यक
पंडीत गौरव देशपांडे ; समग्र समाजासाठी उपयुक्त
रत्नागिरी, ता. २६ः ठराविक कर्म त्या योग्य वेळेला झालं तर त्याच फळं आपल्याला मिळतं आणि यासाठी आपण पंचांग रोज पाहणे आणि त्यानुसार दिनचर्या करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुण्यातील पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे (सिद्धांत जोतिषरत्न गणकप्रवर) यांनी केले.
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आयोजित पंचांग कार्यशाळा ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात झाली. त्या वेळी पं. देशपांडे बोलत होते. या कार्यशाळेला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पंचांगाची पाच अंगे शक व त्याची माहिती पं. देशपांडे व वेंगुर्ल्याचे वेदमूर्ती भूषण जोशी यांनी दिली. श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेसंबंधी थोडक्यात माहिती दिली.
कार्यशाळेत वेदमूर्ती भूषण जोशी म्हणाले की, अनेकांचा असा समज आहे की, पंचांग केवळ ब्राह्मण अशा एका विशिष्ट समाजाचा भाग आहे; पण तसं नसून पंचांग समग्र समाजासाठी उपयुक्त आहे. त्यातही सर्वात प्राचीन पंचांग जे आहे ते सूर्यसिद्धांत; मात्र महाराष्ट्रात ही पद्धत नसून इथे तऱ्हेतऱ्हेचे पंचांग वापरले जाते. यामुळे आपला उत्सव सण एखादे व्रत यात एकसुत्रीपणा वेळेच्या बाबतीत राहत नाही.
कार्यशाळेत रत्नागिरी व सिंधदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यातून पंचांगप्रेमी अभ्यासक आले होते. पंचांगाची तिथी, वार, योग, नक्षत्र, करण यांची सखोल माहिती, विविध व्रते, दान कोणत्या तिथीवर करावे, कोणत्या वाराला काय करावे, काय करू नये, अडचण उद्भवल्यास शास्त्र काय सांगते, अशा विविध विषयांवर विस्तृत माहिती दिली. पुरोहित, ज्योतिषी व सर्वसामान्य व्यक्ती यांच्यासाठी नित्याच्या जीवनात उपयुक्त असणारी पंचांग, धर्मशास्त्र व ज्योतिषविषयक माहिती कार्यशाळेत देण्यात आली. नक्षत्र म्हणजे काय, कोणती नक्षत्रे कोणत्या कामांसाठी वापरावीत, अवकहड चक्र, घातचक्र यांचा उपयोग, जन्मनक्षत्रावर कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या करू नयेत याची माहिती दिली. गुणमेलनाविषयी थोडक्यात माहिती आणि कोणता मुहूर्त कोणास कसा लाभतो ते काढण्याची माहिती दिली. या कार्यशाळेत शेवटी उपस्थित लोकांनी शंका गुरुजींना विचारल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81045 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..