रत्नागिरी ः उपपरिसराच्या विद्यार्थ्याला 3 लाखांचं पॅकेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः उपपरिसराच्या विद्यार्थ्याला 3 लाखांचं पॅकेज
रत्नागिरी ः उपपरिसराच्या विद्यार्थ्याला 3 लाखांचं पॅकेज

रत्नागिरी ः उपपरिसराच्या विद्यार्थ्याला 3 लाखांचं पॅकेज

sakal_logo
By

- rat२६p३५.jpg
L३८६७९
- राकेश महाडिक
.....
रत्नागिरी उपपरिसराच्या
विद्यार्थ्याला ३ लाखांचं पॅकेज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून रसायनशास्त्र ऑरगॅनिक विभागाच्या राकेश महाडिक या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. त्याला लोटे येथील घरडा केमिकल कंपनीनेने ३ लाखांचे पॅकेज दिले आहे.
उपपरिसराच्या एमएससीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी निवड करण्यात आली होती. या सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती लोटे येथील घरडा केमिकल कंपनीतर्फे घेण्यात आल्या. त्याची व्यवस्था रत्नागिरी उपपरिसरामधील प्लेसमेंट सेलमार्फत केली होती. त्यात राकेश महाडिक या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे. तब्बल तीन लाखांचे पॅकेज राकेशला कंपनीने दिले. या यशाबद्दल रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, सहाय्यक कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी राजेश महाडिक याचे तसेच प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. विजय गुरव व सदस्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81047 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..