
निसर्ग सौंदर्याने भारावले विद्यार्थी
38755
कांदळगाव ः ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मसुरे-चांदेर येथील धबधबा, तळाणी खाजण क्षेत्राला दिलेली भेट.
निसर्ग सौंदर्याने भारावले विद्यार्थी
ओझर विद्यामंदिरची मसुरे धबधबा, खाजण सरोवरास भेट
मालवण, ता. २६ ः ओझर (ता. मालवण) विद्यामंदिर कांदळगाव या उपक्रमशील प्रशालेने नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषयाच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून भौगोलिक क्षेत्रांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन केले. क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत मसुरे-चांदेरवाडी येथील नैसर्गिक धबधबा आणि तळाणी येथील खाजण सरोवर या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांनी या भौगोलिक क्षेत्रांविषयी माहिती मिळविली.
या उपक्रमामुळे ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी बिनभिंतीच्या निसर्गातील शाळेत मुक्त शिक्षणाचा अनुभव घेतला. भूभागावरील कठीण आणि मृदू खडकाच्या सान्निध्यामुळे नैसर्गिक धबधब्यांची निर्मिती, खारकच्छ किंवा खाजण सरोवराची निर्मिती, खाजण सरोवराचे फायदे, कांदळवनाची आवश्यकता, जतन व संवर्धन याविषयी भूगोल शिक्षक प्रवीण पारकर आणि डी. डी जाधव यांनी माहिती दिली. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पठारी भागावर वनभोजनाचाही आनंद लुटला. प्रशालेच्या वतीने अशा क्षेत्रभेटीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. ओझर विद्यामंदिरच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पंचक्रोशीतील सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81068 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..