कनेडी हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनेडी हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन
कनेडी हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

कनेडी हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

sakal_logo
By

38784
कनेडी ः रानभाजी प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी.

कनेडी हायस्कूलमध्ये
रानभाज्यांचे प्रदर्शन
कनेडी, ता. २७ ः येथील कनेडी गट शिक्षणप्रसारक मंडळ (मुंबई) संचलित माध्यमिक विद्यामंदिर (कनेडी), श्री. एम. एम. सावंत कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, श्री. तुकाराम शिवराम सावंत विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर कनेडी प्रशालेतर्फे नवनवीन उपक्रम राबविले जातात. यंदा विद्यार्थ्यांना परिसरातील भाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांना आहारातील भाज्यांचे महत्त्व समजावे, या हेतूने रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनात कुड्याच्या शेंगा, भारंगी, कुरडू, टाकळा, एकपानी, फागल, सातपानी, पेवगा, मुगीण, फोडशी, शेवगा, सुरण, दुदुरली, अळू, अळवड्याचे अळू, घोट्याचे वेल, दिंड्याचे वेल, रानबांबूचे कोंब अशा पारंपरिक प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता. सहायक शिक्षक डी. व्ही. सावंत, मकरंद आपटे यांनी प्रशालेचे प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाला मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81076 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top