2 नगरसेवक ठाकरेनिष्ठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 नगरसेवक ठाकरेनिष्ठ
2 नगरसेवक ठाकरेनिष्ठ

2 नगरसेवक ठाकरेनिष्ठ

sakal_logo
By

- rat26p45.jpg-
३८७७०
रत्नागिरी ः उपनेते आमदार राजन साळवी यांच्यासह बाबा नागवेकर, बंटी कीर आणि शिवसेनेचे अन्य नगरसेवक.

सामंतना भेटलेल्यांपैकी दोन नगरसेवक ठाकरेनिष्ठ

आमदार साळवी; विकासात्मक कामाच्या बैठकीला गेले

रत्नागिरी, ता. २६ ः आमदार उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या सतरा मावळत्या नगरसेवकांचा फोटो सोशल मीडियावर सोमवारी (ता. २५) सायंकाळी व्हायरल झाला होता. सामंत यांना भेटलेल्यांपैकी बाबा नागवेकर आणि बंटी कीर या दोन जणांनी काही तासांतच शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवींची भेट घेऊन आम्ही शिंदेचे समर्थक नाही, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहोत, असे सांगत धक्का दिला.
एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमदार उदय सामंत यांच्या सोमवारच्या (ता.२५) दौऱ्यात सायंकाळी काही नगरसेवकांनी भेट दिली. त्यानंतर १७ नगरसेवक हे शिंदे गटाचेच अशा चर्चेला तोंड फुटले. त्यात शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र भरणाऱ्या‍ नऊ जणांपैकी बाबा नागवेकर, बंटी कीर यांचाही समावेश होता. या प्रकारामुळे शिवसेनेतच खळबळ उडाली होती; परंतु काही तासांतच या प्रकारासंदर्भात उपनेते डॉ. राजन साळवी यांनी खुलासा केला. ते म्हणाले, ‘नगरपालिकेत १७ नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले होते. त्यातील ९ नगरसेवक हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्व मानणारे आहेत. सोमवारी संध्याकाळी आमदार उदय सामंत यांनी सर्व नगरसेवकांना निमंत्रित केले होते. त्या बैठकीला अन्य नगरसेवकांसह बाबा नागवेकर, बंटी कीरही उपस्थित होते. विकासात्मक कामाची बैठक असल्यामुळे ते तेथे गेले होते. त्यानंतर आमदार सामंत यांनी सर्व नगरसेवकांबरोबर फोटो काढला आणि शूटिंग केले. तो फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर कीर आणि नागवेकर हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रमोद शेरे यांच्याकडे गेले होते. त्यांना भेटले आणि ते रात्री माझ्या घरी घेऊन आले. दोघांनीही झाला प्रकार सांगितला. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचेही सांगितले आहे.
-----------------------------
चौकट
राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड
आम्ही सामंतांबरोबर असा विश्‍वास दिला, अशी चर्चा असलेल्या सतरा नगरसेवकांमधील दोन जणांनी काही तासांत पुन्हा शिवसेनेच्या उपनेत्यांपुढे जाऊन आम्ही तुमचेच असे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81080 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..