अल्पवयीन पीडितेची वसतीगृहात रवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन पीडितेची वसतीगृहात रवानगी
अल्पवयीन पीडितेची वसतीगृहात रवानगी

अल्पवयीन पीडितेची वसतीगृहात रवानगी

sakal_logo
By

एक अल्पवयीन पीडिता
समुपदेशनासाठी वसतीगृहात
सिंधुदुर्गनगरी ः एका अल्पवयीन पीडित मुलीला कणकवली पोलिसांनी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी व समुपदेशनासाठी ‘सखी वन स्टॉप’ सेंटर, सिंधुदुर्ग येथे दाखल केले. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला बालकल्याण समिती, सिंधुदुर्गसमोर हजर करण्यात आले व तिच्या पुढील निवासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने तिला अंकुर महिला वसतिगृह, सावंतवाडी येथे दाखल केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पाटील, कणकवली पोलिस ठाणे, वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक अॅड. पूजा काजरेकर, सल्लागार अॅड. रुपाली प्रभू, केस वर्कर चैत्राली राऊळ, अॅड. मीनाक्षी नाईक, पॅरामेडिकल स्टाफ नर्स योगिता परब, स्नेहा मोरे, पॅरालिगल लॉयर अॅड. सुवर्णा हरमलकर, मेड सरिता कुंभार, सूरक्षारक्षक अभिषेक मयेकर, विजय पांग्रडकर, देवेंद्र नाईक, आयची स्टाफ आर. बी. साईल, आदी उपस्थित होते. यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड. संदेश तायशेटे यांचे सहकार्य लाभले.
----------
सिंधुदुर्गात ३१ला शिष्यवृत्ती परीक्षा
सिंधुदुर्गनगरी ः पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी) आणि पूर्व माध्यमिकची (८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता.३१) जिल्ह्यातील एकूण ७३ केंद्रांवर होणार असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली. पाचवीसाठी ४४ केंद्रे व आठवीसाठी २९ केंद्रे आहेत. पाचवीसाठी ३४९६ व आठवीसाठी १९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्र परीक्षेच्या ठिकाणी अनिवार्य आहे. परीक्षा दोन सत्रांत होणार असून सकाळी अकरा ते साडेबारा पेपर क्रमांक -१ व दुपारी दीड ते तीन पेपर क्रमांक -२ होणार आहे. सर्व पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी. कोणतीही शंका असल्यास जवळच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय व केंद्रशाळामध्ये संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी परीक्षेला संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी किमान ३० मिनीटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
---------------
निवृत्त कर्मचाऱ्यांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यामध्ये स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेअंतर्गत ड्रोन सर्व्हे व इतर अनुषंगिक कामकाजासाठी भूमि अभिलेख विभागातील इच्छुक असलेल्या निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत.ए विंग, दुसरा मजला सिंधुदुर्गनगरी या पत्यावर अर्ज द्यावेत, असे आवाहन केले आहे. या योजनेअंतर्गत कामासाठी निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी चालू नसावी. तसेच त्यांचे वय ६५ वर्षांचे आत असावे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेखाचे अधिकारी डॉ. विजय वीर यांनी दिली.
--------------
कणकवलीत सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः चौवीस तासांत कणकवली तालुक्यात सर्वाधिक १२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ७.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १८७२.० मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ५.२ (१५०४.८), मालवण- ५.४ (१७५३.३), सावंतवाडी- ७.४ (२२१३.८), वेंगुर्ले- ५.३ (१८८३.४), कणकवली- १२.८ (१७८२.०), कुडाळ- ९.३ (२०३६.४), वैभववाडी- ३.९ (१९७८.६), दोडामार्ग- ५.८ (२१३५.९).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81084 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top