काँग्रेसचे सिंधुदुर्गनगरीत मूक आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे सिंधुदुर्गनगरीत मूक आंदोलन
काँग्रेसचे सिंधुदुर्गनगरीत मूक आंदोलन

काँग्रेसचे सिंधुदुर्गनगरीत मूक आंदोलन

sakal_logo
By

टीपः swt२६१५.jpg मध्ये फोटो आहे.
सिंधुदुर्गनगरी ः केंद्राविरोधात जिल्हा काँग्रेसने छेडलेले आंदोलन.


काँग्रेसचे सिंधुदुर्गनगरीत मूक आंदोलन

केंद्राचा निषेध; सोनिया गांधींची सुडबुद्धीतून चौकशी

सिंधुदुर्गनगरी, ता. २६ ः काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर ‘ईडी’चा सहारा घेऊन राजकीय सूडबुद्धीने केंद्रामार्फत होणारी छळवणूक ताबडतोब थांबवावी, या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओरोस येथे मूक सत्याग्रह करण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्राला देण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सूडबुद्धीने होत असलेली ही छळवणूक तत्काळ थांबवावी, अशी मागणी करत केंद्राच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक मूक सत्याग्रह आंदोलन केले. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इरशाद शेख यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात साईनाथ चव्हाण, अभय शिरसाट, विकास सावंत, अरविंद मोडकर, विभावरी सुकी, विजय प्रभू, प्रकाश जैतापकर आदी सहभागी झाले.
निवेदनात म्हटले आहे की, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अधोगतीला जात आहे. कधी नवे एवढी प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली आहे. प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी हे केंद्राकडून होणारा अन्याय आणि धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी केंद्राचा हा खटाटोप आहे. सोनिया गांधी आजारातून पूर्णतः बऱ्या झालेल्या नसतानाही त्यांना वारंवार बोलावून त्यांची ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. ही छळवणूक तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्ष इरशाद शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81119 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..