आई परमेश्वरापेक्षा महान असते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आई परमेश्वरापेक्षा महान असते
आई परमेश्वरापेक्षा महान असते

आई परमेश्वरापेक्षा महान असते

sakal_logo
By

kan२७४.jpg
३८८५३
कणकवली ः पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार करताना अॅड. राजेंद्र रावराणे सोबत प्रा. जी. ए. सावंत, व्ही. के. सावंत आदी
----
आई परमेश्वरापेक्षा महान असते
पद्मश्री मधु मंगेश कर्णिकः कुंभवडे येथे मायादेवी रावराणे यांचा २१ वा स्मृतिदिन
कणकवली, ता. २७ः आईची महती अनादिकालापासून सर्वांना ज्ञात आहे. अमेरिकेचा अंतराळवीर निल आर्मस्ट्रॉन्ग यांने देखील चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकवण्या अगोदर आईची प्रार्थना केली. तिचे स्मरण करून आपणास जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. असे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी येथे केले. ( कै.) मायादेवी विश्राम रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
(कै.) मायादेवी रावराणे यांचा २१ वा स्मृतिदिन शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या शाळेच्या सभागृहात झाला. हा कार्यक्रम मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत आयोजित केला होता. कार्यक्रमास मायादेवी चॅरिटेबल अध्यक्ष अँड. राजेद्र रावराणे यांनी प्रास्ताविक करून ट्रस्टमार्फत चालू केलेल्या सेवाभावी कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमास पत्रकार शशीकांत सावंत, व्ही. के. सावंत, प्रसाद रावराणे, प्रा. डॉ. विक्रांत रावराणे, डॉ. शमिका बिरमोळे, राजेश्री रावराणे, राजन साटम, सुरेश सावंत, अनंत पिळणकर, गुरूनाथ पेडणेकर आदीसह ग्रामस्थ, पालकवर्ग, विद्यार्थी, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने कुंभवडे गावातील जेष्ठ मातांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच (कै.) मायादेवी रावराणे मालवणी वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेमध्ये “माझी आई” या विषयावर घेतलेल्या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये भक्ती अनंत सावंत हिने प्रथम क्रमांकाचे मालवणी भाषण साजरे करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक जी. ए. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मायादेवी चॅरिटेबल अध्यक्ष अँड. राजेद्र रावराणे यांनी प्रास्ताविक करून ट्रस्टमार्फत चालू केलेल्या सेवाभावी कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81220 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..