‘सावंतवाडीतील जुन्या मार्गावरील अवजड वाहतूक थांबवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सावंतवाडीतील जुन्या मार्गावरील अवजड वाहतूक थांबवा’
‘सावंतवाडीतील जुन्या मार्गावरील अवजड वाहतूक थांबवा’

‘सावंतवाडीतील जुन्या मार्गावरील अवजड वाहतूक थांबवा’

sakal_logo
By

38913
सावंतवाडी ः अनामिका चव्हाण यांना निवेदन देताना दिलीप भालेकर, राजू बेग.


‘जुन्या मार्गावरील अवजड
वाहतूक तातडीने थांबवा’

सावंतवाडीप्रश्नी ‘बांधकाम’चे वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः शहरातील मोरी तलावाची कोसळलेली संरक्षण भिंत लक्षात घेता तेथून जाणाऱ्या जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी सावंतवाडी शहर भाजप उपाध्यक्ष दिलीप भालेकर व माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे.
श्री. भालेकर व श्री. बेग यांनी नुकतीच बांधकामच्या कार्यकारी अभियंता सौ. चव्हाण यांची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन दिले. सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-गोवा महामार्गालगत मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळल्याने महामार्गाला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून सद्यस्थितीत सर्व प्रकारची वाहतूक सुरू आहे. शिवाय पावसाळा सुरू असल्याने तसेच महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू असल्याने संरक्षण भिंतीच्या कोसळलेल्या भागात पाणी झिरपून माती कमजोर होत आहे. त्यामुळे रस्त्याचा भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा धोका लक्षात घेता या मार्गावरील अवजड वाहतूक तत्काळ रोखून संभाव्य धोका टाळावा, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81271 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top