आंबोली सरपंचपदी भाजपच्या पालेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली सरपंचपदी भाजपच्या पालेकर
आंबोली सरपंचपदी भाजपच्या पालेकर

आंबोली सरपंचपदी भाजपच्या पालेकर

sakal_logo
By

swt२७१६.jpg
38936
सावित्री पालेकर

आंबोली सरपंचपदी भाजपच्या पालेकर
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २७ः येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सावित्री पालेकर यांची निवड झाली. आंबोली ग्रामपंचायत सभागृहात आज सरपंच निवड झाली. यात भाजपकडून दत्तू नार्वेकर आणि सावित्री पालेकर यांनी, तर शिवसेनेकडून काशिराम राऊत यांनी अर्ज भरला होता. यावेळी नार्वेकर यांनी अर्ज मागे घेतला. पालेकर यांना ६ मते, तर शिवसेनेचे राऊत यांना ४ मते मिळाल्याने सरपंचपदी पालेकर यांची सरपंचपदी निवड झाली. मतदानासाठी १० सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी जी. आर. लोंढे आणि ग्रामविकास अधिकारी रतिलाल बहिराम उपस्थित होते. उपसरपंचपदी दत्तू नार्वेकर कायम आहेत. त्यांच्याकडे सरपंचपदाचा प्रभारी पदभार होता. सरपंच निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81303 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..