मालवणात समूह गीतगायन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात समूह गीतगायन स्पर्धा
मालवणात समूह गीतगायन स्पर्धा

मालवणात समूह गीतगायन स्पर्धा

sakal_logo
By

मालवणात समूह
गीतगायन स्पर्धा
मालवण ः येथील आस्था ग्रुपच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त १३ ऑगस्टला देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा सकाळी १० वाजता आयोजित केली आहे. ही स्पर्धा शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे. स्पर्धा पाचवी ते दहावी आणि महाविद्यालयीन अशा दोन गटांत स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी आपली नावे सौगंधराज बादेकर यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
..................
परुळेत शनिवारी
साहित्य वाटप
कुडाळ ः ''राधारंग फाउंडेशन'' पुरस्कृत ''अनिल-अनुराधा तिरोडकर सदाप्रेम'' योजनेतून अनिल तिरोडकर यांच्या जन्मदिनानिमित्त शनिवारी (ता. ३०) सिंधुदुर्गमधील २६ गरजू ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा कार्यक्रम श्री अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परुळे येथे दुपारी ४.३० वाजता आयोजित केला आहे. राधारंग फाउंडेशन आणि डॉ. उर्मिला व डॉ. तन्मय लाल यांच्या देणगीतून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. औपचारिक प्रारंभानंतर या वस्तू लाभार्थींपर्यंत पोच केल्या जातील. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन राधारंग फाउंडेशनने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81350 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top