निकेत पावसकरांचा तळेरेत 6 ला सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकेत पावसकरांचा तळेरेत 6 ला सत्कार
निकेत पावसकरांचा तळेरेत 6 ला सत्कार

निकेत पावसकरांचा तळेरेत 6 ला सत्कार

sakal_logo
By

38972
निकेत पावसकर

पावसकरांचा तळेरेत ६ला सत्कार
तळेरेः पत्र संग्राहक म्हणून महाराष्ट्रात ख्याती मिळविलेले तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या पत्रसंग्रह प्रारंभाला यावर्षी पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ६ ऑगस्टला सायंकाळी चारला तळेरे ‘अक्षरघर’ येथे त्यांचा गौरव आणि मुलाखत असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला आहे. किशोर मोरजकर चारिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या हस्ते पावसकरांना गौरविण्यात येणार आहे. साहित्य-समाज चळवळीतील कार्यकर्ते अॅड. विलास परब यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमात कवी राजेश कदम हे पावसकरांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. पावसकरांच्या वाटचालीचा प्रवास जाणून घेण्यासाठी या संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81355 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top