चिपळूण ः आरक्षण मिळाले पण वादाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः आरक्षण मिळाले पण वादाची शक्यता
चिपळूण ः आरक्षण मिळाले पण वादाची शक्यता

चिपळूण ः आरक्षण मिळाले पण वादाची शक्यता

sakal_logo
By

2L39112ः संग्रहीत
...
ओबीसी आरक्षणाचे राजकारणः लोगो
....
वाद टाळण्या, निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान

चिपळुणात एकाच समाजाचे उमेदवार आमनेसामने; पेच निर्माण होणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः पालिका निवडणुकीसाठी ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळाले खरे परंतु एकाच प्रभागात एकाच समाजातील दोनपेक्षा जास्त उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. यातून वादाचे प्रसंगही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा पर्याय ओबीसी समाजातील नेत्यांपुढे आहे.
चिपळूण पालिकेतील आठ जागांवर ओबीसीच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे त्या जागी कोणता उमेदवार द्यायचा, याचा पेच आघाड्यांच्या नेत्यांसमोर आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे चाचपणी सुरू झाली आहे. प्रत्येक वॉर्डातील ओबीसी समाजातूनही सर्वांनुमते एक उमेदवार देण्यासाठी बैठकांचा घाट घातला जात आहे. ओबीसी आरक्षणाचे आदेश आले असले तरी अद्याप त्याच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. तत्पूर्वीच ओबीसी समाजातील नेतृत्वाभोवती विविध पक्षातील नेत्यांचा पिंगा दिसतो आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातून ओबीसीचे उमेदवार कोण असणार, याची आता चर्चा रंगत आहे.
चिपळूण पालिकेत एकूण १४ प्रभागात २८ नगरसेवक असणार आहेत. यातील अनुसूचित जातीसाठी एक जागा यापूर्वीच आरक्षित झाली आहे. त्यामुळे उर्वरित २७ जागांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण द्यावे लागणार आहे. त्यासाठी आठ जागा निश्चित होणार आहे. त्याबाबत लेखी आदेशही शासनाने जारी केला आहे. सात जागांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात आता ओबीसी आरणाक्षाचा घोर लागला आहे. ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देताना पूर्ण आरक्षण ५० टक्क्यांवर जाऊ नये, याची काळजी घेण्याचा आदेशही निवडणूक आयोगाने घेतला आहे.
...
चौकट
प्रत्येक नेतृत्व आता शड्डू ठोकून उभा
चिपळूण पालिकेच्या वाट्याला ओबीसी समाजातील आठ जागा येत आहेत. ओबीसी समाजाचे प्राबल्य असलेल्या प्रभागातील प्रत्येक नेतृत्व आता शड्डू ठोकून उभा आहे. आता आम्हीच अशी अलिखित जाहिरात ओबीसी समाजाचे नेते करत आहोत; मात्र आरक्षणामुळे एकाच समाजातील दोनपेक्षा जास्त व्यक्ती निवडणुकीसाठी उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच प्रभागात एकाच समाजातील दोनपेक्षा जास्त उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. यातून नातेसंबंधात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी सर्वानुमते एकच उमेदवार देण्याचा विचारप्रवाह पुढे येत आहे. त्यासाठीच्या बैठकांना जोर आला आहे.
---------------
कोट
राजकीय नेते आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रसंगी एकाच घरातील दोन व्यक्तींना लढवतात. उमेदवारी मिळाल्यानंतर वेगळा उत्साह तयार होतो. निवडणुकीची नशा चढते. प्रचारादरम्यान आपण कोणावर आरोप करतो, याचे भानही राहत नाही. प्रसंगी अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला जातो. एकदा निवडणूक झाली की, निवडणुकीच्या निमित्ताने एकाच समाजातील दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबामध्ये निर्माण होणारी दरी वर्षानुवर्षे कायम राहते. हा अनेक वर्षाचा अनुभव आहे. तो टाळण्यासाठी ओबीसी समाजाने एकत्र येऊन निवडणूक बनविरोध केलेली बरी.
- परवेझ देसाई, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81377 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..