
राजापूर-राजापुरातील महापुरुष देवस्थानजवळ भूस्खलन
rat27p24.jpg
38996
राजापूरः भूस्खलन होत असलेला भाग.
----------
राजापुरातील महापुरुष देवस्थानजवळ भूस्खलन
राजापूर, ता. २७ः शहरातील एसटी डेपोसमोरील बंगलवाडी येथे गुरव समाजाचे महापुरुष देवस्थान असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी बंगलवाडीतील रहिवाशी व भाजपाचे शहराध्यक्ष विवेक गुरव यांनी राजापूर तहसीलदारांकडे केली आहे.
या महापुरुष मंदिराच्या लगतची जागा मुंबई-गोवा महामार्गासाठी घेतली आहे. या ठिकाणी या देवस्थानाशेजारी सुमारे ५० फूट खोदकाम करून सिमेंटची भिंत उभारली आहे. ही भिंत उभारताना के. सी. सी. या ठेकेदार कंपनीने सिमेंट भिंत व देवस्थानाची जागा यामध्ये मोठी पोकळी ठेवल्यामुळे देवस्थानाकडील जमिनीचे भूस्खलन होऊन हानी होऊ लागली आहे. त्यामुळे या देवस्थानाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी गुरव यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81386 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..